स्पेशल रिपोर्ट; अवघ्या 72 तासांमध्ये पक्के दात बसवा : डॉ.ढवळे यांचा यशस्वी उपक्रम
पुणे : सासवड शहरात डॉ.ढवळे यांचे दातांचा दवाखाना येथे गुंतागुंतीची ,अवघड अशी ,दंत रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, शक्य होतात जेव्हा उत्तम कौशल्य, अत्याधुनिक उपकरणे, व अत्याधुनिक ज्ञानाचा संगम होतो तेव्हा अवघडातील अवघड गोष्टी सहज आणि सोप्या होतात .याची प्रचिती घडवत डॉक्टर ढवळे दातांचा दवाखाना येथे अशीच बेझल ईप्लांट कृत्रिम दंत रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली .
डॉ.ढवळे यांचे सासवड शहरात प्रशस्त ,अत्याधुनिक सामग्रीने सुसज्ज असे दातांचा दवाखाना नव्हे तर दातांचे हॉस्पिटल आहे.
गेली वीस वर्षाचा दांडगा अनुभव ,सोबत उत्तम कौशल्य अत्याधुनिक ज्ञान ,व अत्याधुनिक उपकरणे यांच्या साह्याने ज्यांना अजिबात दात नाहीत अशा त्यांच्याकडील एका पेशंटला अवघ्या 72 तासात पूर्ण पक्के स्वरूपाचे दात यशस्वीरित्या बसविण्यात आले.
डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे, डॉक्टर उमाकांत ढवळे, डॉक्टर मोनिका बताले व त्यांचे सहकारी यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
कृत्रिम दंत रोपण ही सध्या खूपच प्रचलित ,जलद ,सुलभ व विना त्रासाची कृत्रिम दंत रोपन शस्त्रक्रिया आहे, त्याबद्दल आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया,
तोंडात मजबूत दात नसणे हे अतिशय क्लेशदायक आहे.
दात नसल्यामुळे/हलणाऱ्या दातांमुळे किंवा खूप कमी दात असल्यामुळे, ज्यांना अन्न चावता येत नाही, तेच ही वेदना सांगू शकतात. अन्नाचे नीट चर्वण न झाल्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. तसेच पुरेशा पोषणाअभावी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.
त्यासोबतच, चेहऱ्याचे सौंदर्य कमी होणे,
चेहरा/हास्य बिघडणे, बोलताना उच्चार अस्पष्ट येणे या गोष्टींना सुद्धा सामोरे जावे लागते. परिणाम स्वरूप व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो.
अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त अशा ‘ स्ट्रॅटेजिक इंप्लांट/ इमेडिएट लोडिंग इंप्लांट च्या मदतीने ७२ तासांत फिक्स दात बसविणे आता शक्य झाले आहे.
अगदी तिसऱ्या दिवसापासूनच रुग्णाला या दाताचा वापर करून अन्न चावता येते. तसेच त्याच्या चेहऱ्याचे सौंदर्य पुन:प्रस्थापित होते. आणि मनमोहक हास्य ही, कृत्रिम दंत रोपण शस्त्रक्रिया ही अतिशय कौशल्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे .ज्यामध्ये तुमच्या अत्याधुनिक ज्ञान व योग्य ते उपकरणे वापरल्यास ही अवघड शस्त्रक्रिया खूप सोपी होऊन जाते.
या शस्त्रक्रियेचा फायदा म्हणजे या
1) पेशंटला कुठलाही त्रास होत नाही.
२) या शस्त्रक्रियेत कुठल्याही प्रकारे इंसिजनम्हणजे कुठल्याही पद्धतीची चिरफाड होत नाही,.
3) रक्तस्त्राव हा खूपच कमी असतो.
4) ही शस्त्रक्रिया छोट्या छिद्राद्वारे केली जाते .
5) यात कुठले पद्धतीची टाके टाकले जात नाहीत
6) तीन ते चार तासात पेशंट आपल्या घरी हसत-खेळत जातो.
7) मधुमेह अथवा हृदयविकाराने ग्रस्त लोकांसाठी सर्वात उपयुक्त असा हा पर्याय आहे .
8) कुठल्याही प्रकारचे बोन ग्राफ्ट अथवा हाडाची पूड वापरण्याची आवश्यकता नाही.
9) शस्त्रक्रिया मध्ये आपणास ॲडमिट होण्याची देखील आवश्यकता नसते .
10) शस्त्रक्रियेनंतर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन ची भीती नसते .
11) कौशल्यपूर्ण पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रिये मध्ये failure चे प्रमाण अगदी नगण्य असते
12) म्यूकरमायकोसिस ,कॅन्सर पेशंटसाठी ज्यांचा पूर्ण जबडा काढलेला आहे, यांसाठी तर ही शस्त्रक्रिया वरदान ठरते.
13) सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रक्रिया खूपच जलद आहे अवघ्या तीन दिवसाच्या आत आपल्याला नवीन दाताने चांगल्या पद्धतीने जेवण करता येते.
14) एकदाच एक दात पडला असेल अथवा काढला असेल किंवा आपण अंशतः कवळी, कवळी वापरत असाल , आश्या पेशंटसाठी कृत्रिम दंतरोपण शस्त्रक्रिया ही फायदेशीर ठरते.