लॉज च्या नावाखाली खुले आम वेश्या व्यवसाय सुरू

लॉज च्या नावाखाली खुले आम वेश्या व्यवसाय सुरू

पोलीस आणि राजकीय प्रतिनिधी चे मात्र दुर्लक्ष

पुणे : कात्रज बेंगलोर हायवे वर लॉज च्या नावाखाली खुले आम वेश्या व्यवसाय सुरु आहे. या हद्दी मध्ये बरेच शी लॉज आहेत रोज संध्याकाळी जत्रा भरल्या सारखी गर्दी या ठिकाणी असते बरीच व्यवसाय करणारी महिला या ठिकाणी असतात एक जरी गाडी उभी राहीली की जवळपास 10 ते 12 मुली जमा होतात या अश्या खुलेआम व्यवसाय होत असताना पोलीस काहीच कारवाई करतांना दिसत नाही .या अश्या व्यवसाय करणाऱ्या मुली अनेक जणांना रूम मध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना लुटत असतात त्यांच्या कडुन पैसे घेऊन दमदाटी करून पळुन लावतात या जवळपास राहणाऱ्या नागरिकांना या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे पण कोणीही काही बोलत नाही आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था इथे राहणाऱ्या नागरिकांना ची झाली आहे.तरी पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते यांनी याकडे लक्ष घालण्याची अत्यंत गरज आहे.

About The Author