मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांची कैलास निवासस्थानी सदिच्छा भेट

मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांची कैलास निवासस्थानी सदिच्छा भेट

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कोडगे यांनी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता भाजपा नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते कोडगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपाचे सुर्यकांतराव शेळके, निळकंठराव पवार, जिल्हा सरचिटणीस मनिष बंडेवार, एम.एन.एस. बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले आदी मान्यवर उपस्थीत होते. या वेळी लातूर जिल्हा व ग्रामीण जिल्हा भाजपा पक्ष संघटन संदर्भात व इतर महत्वाच्या प्रश्‍ना संदर्भात चर्चा झाल्याची माहिती निळकंठराव पवार यांनी दिली.

About The Author

error: Content is protected !!