अंध अपंगाना आधार देण्याचे सुडे कुटूंबीयाचे काम कौतुकास्पद

अंध अपंगाना आधार देण्याचे सुडे कुटूंबीयाचे काम कौतुकास्पद

माजी जि.प.अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील बुधोडा येथे अंध अपंगाना स्वयंरोजगार प्रशिक्षण देउन त्यांना प्रशिक्षीत करून तसेच प्रसंगी उद्योगधंदयासाठी मदत किंवा नौकरी लाउन देण्याचे काम सुडे कुटूंबीयाच्या वतीने गेल्या 10 वर्षापासुन केले जात आहे. त्यांच्या या प्रशिक्षण केंद्रामुळे अनेक अंध अपंगाना जिवन जगण्याचा मोठा आधार मिळालेला आहे. हे कार्य अविरत पणे चालू आहे त्यामुळे त्यांचे हे आंध अपंगाना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी आध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले. यावेळी त्या ग्रामीण श्रमीक प्रतिष्ठान बुधोडा ता.औसा येथील स्वयंरोगार प्रशिक्षण केंद्राच्यावतीने आयोजीत शिष्यवृत्‍ती वाटप, प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन किशोरी विकास कार्यशाळा या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी प्रशांत सुडे, प्रेरणाताई सुडे, कमलाकर सावंत, आर्चना साखरे, आष्टूरे, प्रा.राजमाने, शिल्पा सुडे, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनच्या वाघमारे, प्रा.दत्‍ता सुरवसे, आदी मान्यवरांची उपस्थीती होती.

यावेळी पुढे बोलताना प्रतिभाताई पाटील कव्हेकर म्हणाल्या औसा तालुक्यातील 10 वी व 12 वी च्या गरीब होतकरू मुलींचे फीस, शालेय खर्च शिष्यवृत्‍तीच्या माध्यमातून पालकत्व स्विकारने तसेच परिक्षे संदर्भात मार्गदर्शन व मदत करण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून केले जात आहे. या वर्षामध्ये एकुण 60 विद्यार्थी शिष्यवृत्‍ती व शिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच मानव वेदना मुक्‍ती केद्राच्या माध्यमातून नॅचरोथेरेपी केंद्र, अ‍ॅक्यप्रेशर, मसाज थेरेपी आशा आनेक सुविधा आंध आपंगाच्या माध्यमातून देण्याचे काम या केंद्रातून केले जात आहे. त्यामुळे या केंद्राचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक आष्टूरे यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रशांत सुडे यांनी केले. प्रारंभी अ‍ॅक्युप्रेशर व मसाज थेरेपी ट्ेनिंग प्रमाणपत्राचे वितरण मुजावर शेख, सागर चांदणे, बसवंत वाघमारे, प्रेमदास चव्हाण, आम्रपाली भोसले, शुभम पाटील, गोविंद सोनवणे, आदीना करण्यात आले.
यावेळी अंध अपंग प्रशिक्षणार्थ्याची मोठया संख्येने उपस्थीती होती.

About The Author