लोकप्रशासन विषयाचा राष्ट्रीय वेबिनार संपन्न

लोकप्रशासन विषयाचा राष्ट्रीय वेबिनार संपन्न

किल्लेधारूर (प्रतिनिधी) : किल्लेधारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 07 फेब्रुवारी 2022 रोजी एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न झाला वेबिनारच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर दीपक भारती व दयानंद कला महाविद्यालय लातूर येथील प्राचार्य प्रोफेसर शिवाजी गायकवाड तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक राकेश राणा गाजियाबाद यांची विशेष उपस्थिती होती सुरुवातीला भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर राष्ट्रीय वेबिनारचे प्रास्ताविक प्राचार्य प्रोफेसर दीपक भारती यांनी केले. दीपक भारती यांनी सामाजिक शास्त्र विषयातील प्राध्यापकांसाठी उपयुक्त असलेला संशोधन पद्धतीचा विषय आम्ही सर्वांच्या निकडीचा व महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले पुढे बोलताना ते असे म्हणाले की हे महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे या वर्षात आम्ही विविध कार्यक्रम राबविणार आहोत असे म्हणाले उद्घाटक म्हणून बोलत असताना प्राध्यापक राकेश राणा यांनी सामाजिक शास्त्रातील संशोधकांनी समाज सद्यस्थितीत कोणत्या सामाजिक समस्यांना सामोरे जात आहे त्या सामाजिक समस्यांचा विषय म्हणून आपल्या संशोधनामध्ये सहभाग करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले तसेच ते असे म्हणाले की संशोधन हे प्रत्यक्ष क्षेत्र भेटीवर जाऊन माहिती व तथ्य संकलन करून वस्तुनिष्ठ संशोधन होऊ शकते असे मत व्यक्त केले या वेबिनारचे दुसरे वक्ते प्रोफेसर नरेन सिन्हा यांनी संशोधनामध्ये एम एस एक्सल आणि संख्याशास्त्राचा कशा पद्धतीने चांगला वापर करता येऊ शकतो यावर आपले मार्गदर्शन केले त्याने संशोधन पद्धती च्या विविध पायऱ्यावर चांगले संशोधन करण्याच्या अनुषंगाने काय काय खबरदारी घेतली पाहिजे याचे सविस्तर विश्लेषण केले या वेबिनारचा अध्यक्षीय समारोप दयानंद कला महाविद्यालय लातूर चे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड यांनी केला ते पुढे बोलताना असे म्हणाले की मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किल्लेधारुर व आमच्या महाविद्यालयाने संयुक्तपणे राबवलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असा आहे आजच्या कोरोना च्या काळात ऑनलाइन झूम प्रणालीच्या माध्यमातून सामाजिक शास्त्रातील प्राध्यापकांच्या संशोधनाला वैज्ञानिक बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच उपयुक्त व महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले यावेळी पूर्ण देशभरातून जवळपास 80 सहभागी प्रतिनिधी ऑनलाईन स्वरूपात जॉईन झाले होते या वेबिनारचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्फुर्ती समुद्रे ,पाहुण्याचा परिचय डॅा.शिवशंकर कसबे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॅा.रामेश्वर खंदारे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दोन्ही महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले .

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!