दुचाकी अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दुचाकी अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी (प्रकाश इगवे) : दुचाकी अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच मर्डर करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. गव्हाणे वस्ती, भोसरी येथे बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सूरज कांबळे (वय १९, रा. लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी ही मित्राच्या दुचाकीवरून तिच्या बहिणीसह जात होती. त्यावेळी आरोपीने दुचाकी अडविली. फिर्यादीने आरोपीविरोधात यापूर्वी तक्रार दिली आहे. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादीसोबत गैरवर्तन केले.

About The Author

error: Content is protected !!