गर्भपाताच्या गोळ्या बाळगल्याने डॉक्टरवर गुन्हा

गर्भपाताच्या गोळ्या बाळगल्याने डॉक्टरवर गुन्हा

पिंपरी (रफिक शेख) : शासनाची किंवा महापालिकेची परवानगी न घेता गर्भपाताच्या गोळ्या बाळगून रुग्णांना त्या गोळ्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी डॉक्टर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. गव्हाणे वस्ती, भोसरी येथील शीतल क्लिनिक दवाखान्यामध्ये ४ फेब्रुवारीला ही घटना घडली.

डॉ. शीतल प्रशांत बोऱ्हाडे (येवले) (रा. अ गव्हाणेवस्ती, भोसरी), असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी डॉक्टर महिलेचे नाव आहे. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे (वय ५७, रा. पिंपळे सौदागर) यांनी 3 याप्रकरणी गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शीतल क्लिनिक नावाच्या दवाखान्यामध्ये परवानगी घेतली नाही. तसेच सदरचे क्लिनिक नोंदणीकृत नसताना आरोपीच्या या दवाखान्यामध्ये गर्भपाताच्या गोळ्या असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार महापालिकेच्या गर्भपात विरोधी समितीकडून ४ फेब्रुवारीला आरोपीच्या क्लिनिकची पाहणी करण्यात आली. त्यावेळी क्लिनिमध्ये गर्भपाताच्या गोळ्या मिळून आल्या.

About The Author

error: Content is protected !!