संवैधानिक अधिकारावर घाला नको – निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)
उदगीर (प्रतिनिधी) : कर्नाटकामध्ये सध्या मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनींनी बुरखा घातल्यामुळे अनावश्यक वाद निर्माण करण्यात आला आहे. वास्तविक पाहता वेगवेगळ्या धर्माच्या चालीरिती नुसार प्रत्येकाला वागण्याचा अधिकार आहे. कोणीही संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारावर घाला घालू नये, किंवा तसा प्रयत्न करून सामाजिक हिंसाचार होईल अशी कृती करू नये. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे, सोनकांबळे यांनी व्यक्त केले आहे.
सध्या कर्नाटकामध्ये संविधानाच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. ज्या संविधानाला प्रमाण मानून भारतीय प्रजासत्ताक साजरा केला जातो, त्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा वेळी एक न्यायाधीश व्यासपीठावरील घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढायला सांगतो. यापेक्षा दुर्दैव कोणते?
वास्तविक पाहता अशा घटना म्हणजे हेतुतः सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या आहेत. मुस्लिम समाजातील विद्यार्थीनीनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत अर्थात बुरखा घालून येत असतात, त्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नसताना केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करावी. धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे हिंसाचार वाढावा. अशा पद्धतीच्या विकृत बुद्धीने तो विरोध करण्यात आला आहे. आणि दुर्दैव म्हणजे कर्नाटकामधील या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातही ठीक ठिकाणी उमटू लागले आहेत. हे त्वरित थांबली पाहिजे. कोणीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य करू नये. कायदा आणि सुव्यवस्था समाजांमधील शांतता कायम टिकून राहील. या दृष्टीने प्रयत्न करावेत .असेही आवाहन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे, सोनकांबळे यांनी केले आहे.
चौकट………
आंदोलनात सहभागी व्हावे…
अल्पसंख्यांक समाजावर अन्याय आत्यच्यार होऊ नयेत,मुस्लिम महिलांच्या बुरखा घालून फिरण्यावर निर्बंध लादले जाऊ नयेत.या मागणी सोबतच कर्नाटकातील घटनेचा निषध करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी आकरा वाजता संविधान प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन निवृत्ती सोनकांबळे यांनी केले आहे.