तस्करी; बुटात सोने लपविणाऱ्या प्रवाशाला अटक

तस्करी; बुटात सोने लपविणाऱ्या प्रवाशाला अटक

पुणे (रफिक शेख) : अहमदाबादहून पुण्याला येणाऱ्या विमानात प्रवाशाने बुटात सोन्याचे तुकडे ठेवून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाने त्याला पकडून ७०५ ग्रॅम सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्याद्वारे अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला. प्रवासी विमानतळावर दाखल झाल्यावर त्यांची झडती घेण्यात आली. त्यावेळी बुटामध्ये सोन्याची बिस्किटे आढळली. या प्रवाशाला तत्काळ अटक करण्यात आली. या प्रवाशाने दुबई – अहमदाबाद असा प्रवास केला होता.

About The Author

error: Content is protected !!