डॉ. पांडुरंग चिलगर यांचा महात्मा फुले व गांधी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार

डॉ. पांडुरंग चिलगर यांचा महात्मा फुले व गांधी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या लातूर जिल्हा विभागीय समन्वयक पदी निवड केली. याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता शिंदे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, महात्मा फुले महाविद्यालयातील हिंदी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. पांडुरंग चिलगर यांना यापूर्वीच विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ठ कार्यक्रमाधिकारी म्हणून सन्मानित केले असून, त्यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्याची दखल घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले , प्र.कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन व संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी दूसऱ्यांदा डॉ.पांडुरंग चिलगर यांची लातूर जिल्हा विभागीय समन्वयक पदी नेमणूक केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता शिंदे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. सतीश ससाणे, डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारुती कसाब, डॉ. संतोष पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author