संत रविदासांनी समतेची शिकवण दिली – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

संत रविदासांनी समतेची शिकवण दिली - प्रा.मारोती बुद्रुक पाटील

झरी (गोविंद काळे) : समाजातील जातिभेद दूर करून मानवतेचा संदेश देताना थोर क्रांतिकारक संत रविदासांनी राष्ट्रहिताला महत्त्वाचे स्थान दिले असून त्यांचे कार्य समतेची शिकवण देणारे होते, युवकांनी त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा असे आवाहन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले. झरी बु येथे थोर क्रांतिकारक संत गुरू रविदास यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात निवेदक,कवि प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव घायाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अजितदादा खंदारे ,माजी सरपंच दयानंद भाऊ सुरवसे, माजी सरपंच बालाजी मेनचेक्रे, सरपंच नागनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक ठाणे मुंबईचे ओम वंगाटे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राहूल सुरवसे दशरथ भंडे संजय पाटील सिद्धेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की, संत रविदासानी आई-वडिलांची निस्सीम भक्ती केली मानवाच्या कल्याणासाठीच दोह्याच्या रुपाने समाजाला प्रबोधन केले.समतावादी,क्रांतिकारक थोर साहित्यिक,राष्ट्रीय संत म्हणून त्यांचे कार्य राष्ट्रहितासाठी प्रेरणादायी आहे.संत रविदासांनी केलेला उपदेश आजही अंगी करण्यासारखा आहे. भक्तिमार्गातून दिलेला समतावादी संदेश त्यांचे साहित्य आजही लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रभावित करते.ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्याने लादलेला जिझिया कर,बळजबरीने धर्मांतर,मुल्ला काझी, पुराणातील कर्मकांड विषमता,शिक्षण बंदी अंधाधुंद बेबंदशाही व पारतंत्र्या विषयी आणि देशात अगोदरच असलेल्या जाती व अंधश्रद्धा बाबत रोखठोक व परखड विचार दोह्याच्या माध्यमातून त्यांनी प्रहार केला. राष्ट्रहितासाठी कार्य करताना त्यांनी स्वातंत्र्य,समता व बंधुत्वाची बीजे रोवली.मानवाच्या कल्याणासाठी समाजवादी समतेचा विचार देण्याचे कार्य केले.ऐसा चाहु राज मे जहा मिले सबन को अन्न छोटो बडो सब बसे रविदास रहे प्रसन्न.असे सांगत सर्वांना समान न्याय समान हक्क मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी समाजवादी विचार मांडले.आजच्या युवकांनी संत रविदास यांच्या साहित्याचा अभ्यास करून राष्ट्रहितासाठी कार्य करावे असेही प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी सांगितले.या वेळी दयानंद सुरवसे व बालाजी मेनचेक्रे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू सुरवसे यांनी तर आभार लक्ष्मण घायळ यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद घायाळ, जयपाल घायाळ, महादेव घायाळ,अमोल घायाळ,नामदेव घायाळ, संभाजी घायाळ, ज्ञानेश्वर घायाळ, नितीन वाघमारे, लहू सुरवसे, कृष्णा घायाळ, राम घायाळ, गितेश डोंगरे, फिरोज सय्यद, गिरजाप्पा घायाळ, केशव घायाळ, ओम सुरवसे, ईश्वर घायाळ, इनुस शेख, अंबादास घायाळ, गजानन घायाळ, नागनाथ बामणे, भिवाजी बामणे, कृष्णा वाघमारे आदीने प्रयत्न केले.

About The Author