भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशिर मटका; पोलीस अनभिज्ञ होते का?

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशिर मटका; पोलीस अनभिज्ञ होते का?

पुणे (रफिक शेख) : पुण्यातील कात्रज दत्त नगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये बिनधास्त पणे चालणाऱ्या पत्यांच्या क्लब वर सामाजीक सुरक्षा विभागाने छापेमारी करून कारवाई केली आहे. १६ फेब्रुवारी कात्रज दत्त नगर सर्व्हिस रोड आनंद दरबार ट्रस्ट समोर कात्रज येथे पत्र्याचे शेड मध्ये बेकायदेशिर मटका जुगार धंदा चालु असल्याची माहीती मिळाली सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखे कडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनिय रित्या पाळत ठेवून छापा टाकला असता कल्याण मटका जुगार खेळत असताना १० जण मिळुन आले आहे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात रोख रुपये २५ हजार आणि जुगाराचे साहित्य मिळुन आले आहे. १० जणांन विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० जणांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस उप- आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे यांचे आदेश प्रमाणे व मार्गदर्शना खाली सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने. पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके. पोलीस अंमलदार बाबा कर्पे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, प्रफुल्ल गायकवाड यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!