मराठी विभागाची निकालात उज्जवल परंपरा
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेचे, दयानंद कला महाविद्यालय 1960 पासून स्वतंत्ररित्या कार्यरत असून मराठी, हिंदी, इंग्रजी, लोकप्रशासन आणि संगीत पदव्यूत्तर शिक्षण देणारे हे महत्वाचे महाविद्यालय असून अनुदानित मराठी विषयाची पदव्युत्तर गुणवत्ता यादी विद्यापीठात आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवली असून या शैक्षणिक वर्षात मराठी विभागातील गोस्वामी विवेक भारतबन हे यु.जी.सी. अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नेट-परीक्षेत उत्तीर्ण झाले असून राज्य प्राध्यापक चाचणी ‘सेट’ परीक्षेत गुणानुक्रमे गवळी अक्षय अशोक उत्तीर्ण झाले आहेत.
दयानंद कला महाविद्यालय मराठी विभागाचे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रातील लौकिक प्राप्त महाविद्यालयात विभागप्रमुख, प्रोफेसर आणि सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शैक्षणिक वर्षात विभागाचे दोन विद्यार्थी सेट/नेट उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवाजी जवळगेकर डॉ. सूनीता सांगोले, डॉ. सुभाष कदम, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, प्रा. राजकुमार मोरे, प्रा. अंगद भूरे, प्रा. स्नेहा वाघमारे यांनी अभिनंदन केले.