पिंपरी-चिंचवड मध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

पिंपरी-चिंचवड मध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

पिंपरी (रफिक शेख) : दोन चोरट्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिलांच्या सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्या. चिखली येथे रविवारी (दि. २०) रात्री साडेआठच्या सुमारास या घटना घडल्या. वैशाली ऋषिकेश कुलकर्णी (वय ३२, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली कुलकर्णी त्यांच्या पती व मुलासह दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेले. त्याच चोरट्यांनी अॅपल हॉस्पिटल चिखली येथे दुचाकीवरुन जात असलेल्या सुप्रिया साळुंखे या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र हिसकावले.

About The Author

error: Content is protected !!