तडीपार आरोपीने पोलिसांना केली धक्काबुक्की
पिंपरी (प्रकाश इगवे) : परवानगी न घेता शहरात वावरत असलेल्या तडीपार आरोपीवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी आरोपीने पोलिसांना दमदाटी करीत धक्काबुक्की केली. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे रविवारी (दि. २०) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. वीरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय २३, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वीरेंद्र याला २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपार आदेशाचा भंग करून तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी पोलिसांची परवानगी न घेता आरोपी वीरेंद्र हा शहरात आला.