शेकापूर येथे सुप्रसिध्द शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न

शेकापूर येथे सुप्रसिध्द शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : मौजे शेकापूर येथील ‍ शिवजन्मोत्सव सप्ताह समितीच्या वतीने सुप्रसिध्द शिवशाहीर ‘स्वराज्यरक्षक संभाजी फेम’ संतोष साळुंखे यांचा पोवाडे व स्फुर्तिगीतांचा देखणा व दणदणीत कार्यक्रम साजरा झाला. भव्य खुला रंगमंच व चंदेरी विद्यूत लखलखत्या प्रकाशात प्रशस्त अशा बैठकी व्यवस्थेत ग्रामस्थांनी व पंचक्रोशितील शिवप्रेमींनी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचे श्रवण केले. शाहीरांनी वाचिक व देहीक अभिनयाने शिवाजी महाराजांचे संस्कार तरुणईच्या काळीज पटलावर अतिषय मार्मिकपणे प्रक्षेपित केले.

शिवशाहीरांनी शिवजन्मोत्सव सप्ताहात महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला अनुसरुन रंगमंचावर गावातील पाच सुहासीनीस बोलावून बाल शिवबाचा पाळणा घातला. तो नयनरम्य सोहळा पाहून शिवप्रमींचे व गावातील आयाबहीणींचे आनंदाश्रूनी डोळे पाणावले. शिवशाहीरांनी पोवाडा सादरीकरणाच्या वेळी त्या त्या वेळेची वातावरण निर्मिती आपल्या तज्ञ संगीत वादकाकडून करून घेतली त्यात घोड्याच्या टापांचा आवाज, ढालतलवारीचा आवाज, युध्दाचा प्रसंग हुबेहूब उभा केला. अफजलखानाच्या पोवाड्यातील पैजेच्या विड्याच्या वेळी बडीबेगमच्या संवादावेळी त्यांनी आपल्या वाद्यवृंदांकडून इरानी संगीताची किनार दिली व तो क्षण निर्माण केला. एकूणच कार्यक्रम हा प्रबोधनशील, दिमाखदार व मनोरम्य झाला. या देखण्या कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव शिवसप्ताह समिती शेकापूर व संयोजक बाळासाहेब अण्णाराव नवाडे यांनी केले. यावेळी उघ्दाटक म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक भरतभाऊ चामले हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे सर, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. माधव चंबूले सर, डॉ. बाळासाहेब पाटील सर ,धनाजी मुळे, सरपंच ज्ञानोबा कोनोळे, उपसरपंच नवनाथ शिंदे, चेअरमन बाळासाहेब नवाडे,व्हा. चेअरमन मधुकर सावंत, तंटा मुक्ती अध्यक्ष ‍ शिवाजी कोनाळे व गावातील मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव सप्ताह समीतीचे प्रसाद शिवाजी हलकरे, आनंद माधव भागाये, भगवान रतन कोनाळे, व्यंकट बाबाराव पाटील, विक्रम किशन सावंत, गंगाधर सुभाष पिटाळे, ‍ हरि बाजीराव सावंत, बालाजी कैलास मोरे, मनोज तुकाराम सुर्यवंशी, संदीप सुधाकर सावंत, सौदागर तुकाराम कोनाळे, बालाप्रसाद गणपत वाघे, दत्ता बालाजी शेल्हाळे, राजासाहेब अण्णाराव नवाडे, बलभीम नरसींग शेल्हाळे, लिंबाजी माधव उगीले, रामचंद्र नागोराव सावंत, माधव देवेंद्र शेल्हाळे, गंगाधर गुणवंत कानाळे, श्रीकांत ज्ञानोबा कोनाळे, गुंडाजी बाबू शेल्हाळे, ज्ञानेश्वर गोरख कुंभार, रामेश्वर बालाजी बुक्के, इत्यादी कार्यकर्त्यांनी मोलाचे परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोहर विश्वनाथ शिंदे तर आभार बाळासाहेब अण्णाराव नवाडे यांनी मानले.

About The Author