काव्यांकुर हस्तलिखित काव्य संग्रहाचे विमोचन

काव्यांकुर हस्तलिखित काव्य संग्रहाचे विमोचन

उदगीर (प्रतिनिधी) : श्यामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उदगीर येथे *काव्यांकुर * या विद्यार्थिनींच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष श्री सूर्यकांत शिरसे यांच्या हस्ते करण्यात आले.
थोर मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्ष स्थानी श्री सूर्यकांत शिरसे हे होते,मु.अ.श्रीमती तृप्ती कृष्णचंद्र ज्ञाते (पंडित) , शिक्षकवृंद विद्यार्थिनी हजर होत्या.
याप्रसंगी ग्रंथ प्रदर्शन, काव्य लेखन -वाचन
माय मराठी ची महती , मराठी वर होणारे आघात व मराठीची अस्मिता जपण्यासाठी उपाय याबाबत संवाद साधण्यात आला.
. सूत्रसंचालन व मनोगत मराठीच्या विभाग प्रमुख श्रीमती खादीवाले संगीता यांनी व्यक्त केले.सूर्यकांत शिरसे सरांनी श्यामार्य कन्या ग्रंथालयास १०० पुस्तकांची देणगी तर दिलीच ,
शिवाय विद्यार्थिनीच्या हस्तलिखित काव्यसंग्रहाला प्रसाद प्रकाशन तर्फे प्रकाशित करुन देण्याचे जाहीर केले.त्याबद्दल श्यामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.
मु.अ . ज्ञाते यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ,नविन पिढीने मराठी साहित्याचे एक छोटे ग्रंथालय प्रत्येकाच्य घरीअआसवे , साहित्याचे सातत्याने वाचन करावे असे सांगितले .ज्यु.काॅ.पाटील सरांनी विचार मांडले.आभार श्रीमती सुतार संगीता यांनी व्यक्त केले.

About The Author