किलबिल मध्ये विज्ञान प्रदर्शन व खरी कमाई कार्यक्रम उत्साहात संपन्न

किलबिल मध्ये विज्ञान प्रदर्शन व खरी कमाई कार्यक्रम उत्साहात संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेमध्ये दि 26 व 27 फेब्रुवारी असे दोन दिवस विज्ञान प्रदर्शन व खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद लातूर चे गटनेते मंचकराव पाटील व अध्यक्षस्थानी थोडगा केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी कासले तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. एम. पेद्देवाड, द. मा. माने, अंबादास कोंडापुरे, दीपक भराटे, सैदापुरे सर, शिवानंद स्वामी, कुलकर्णी सर, प्रशांत माने,शाळेचे प्राचार्य संतोष पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा व त्यांना विज्ञानाच्या प्रयोगाच्या माध्यमातून आवड निर्माण व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील इयत्ता 1ली ते 10 वर्गातील विद्यार्थ्यांनी एकूण 32 प्रयोगात प्रत्यक्ष भाग घेतला होता.अतिशय चांगल्या प्रकारे प्रयोगाची मांडणी करत सादरीकरण केले. तसेच याच कार्यक्रमाला जोडून विद्यार्थी जीवनातील सर्वात आवडता उपक्रम म्हणजे खरी कमाई स्टॉल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील पहिल्या कमाईचा विलक्षण अनुभव यातून घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले यांनी केले सूत्रसंचालन पर्यवेक्षक महावीर गोडभरले यांनी तर आभार शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author