शिक्षणामुळेच आदर्श नागरिक तयार होतो – प्राचार्या रेखाताई तरडे
अहमदपूर (गोविंद काळे) : मागील दोन तीन वर्षांपासून कोविडच्या काळात शाळा बंद असल्याने काही काळासाठी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला.या काळात मुलं जास्तीत जास्त वेळ मोबाईल सोबत असल्याने आणि पुस्तकांपासून दूर राहिल्याने ब-याच अडचणींना तोंड द्यावे लागले.पण आपल्या शाळेतील शिक्षक गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षण बंद होवू दिले नाही.कारण शिक्षणामुळेच एक चांगला आणि आदर्श नागरिक तयार होतो असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे यांनी केले.
त्या सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर डॉ आशुतोष हाके, पर्यवेक्षक राजाराम बुर्ले, बालाघाट तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य नागरगोजे, सिद्धेश्वर मासुळे, शेख जिलानी यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ आशुतोष हाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्या समोर फक्त शिक्षण हेच ध्येय समोर ठेवून मन लावून अभ्यास केला तर ध्येय गाठता येते.अभ्यासात नियमितता ठेवावी गोंधळून न जाता वेळापत्रक तयार करून त्याप्रमाणे अभ्यास करणे गरजेचे आहे.या परीक्षेच्या काळात लक्ष विचलित न होता अभ्यास करण्याचे आवाहन केले.तर बालाघाट तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने स्वावलंबी जीवन जगण्यासाठी कौशल्य पूर्ण शिक्षणाकडे वळावे त्यासाठी आपल्या संस्थेअंतर्गत बालाघाट तंत्रनिकेतन आणि आय टी आय काॅलेज अतिशय चांगला पर्याय असल्याचे सांगितले.
यावेळी शैक्षणिक वर्षातील आदर्श विद्यार्थीनी म्हणून हाके सुनंदा माणिक या विद्यार्थिनीचा प्राचार्या रेखाताई तरडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी अकरावी व बारावीच्या देवकते ऐश्वर्या, देवकते ज्ञानेश्वरी,श्रीरामे शंतनू,कांबळे निखिल,बुर्ले ओमकार,मुळे सुरज,काडवादे अंबिका, देवकते वनश्री, धुळगुंडे सुप्रिया या विद्यार्थ्यांनी समर्पक मनोगत व्यक्त केले. तर निरोप गीत गोकुंडे संगमेश्वरी आणि धुळगुंडे सविता यांनी सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल गोगडे यांनी केले तर आभार संभाजी दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष मुळे, अच्युत सुरनर, रमेश चेपूरे, राजकुमार पनाळे,दैवशाला शिंदे,चिंतन गिरी,कौशल्या देवकते, तुकाराम शिंगडे, प्रदीप रेड्डी, अमोल सारोळे, जनार्दन मासोळे, गणेश जाधव, गजानन फुलारी,अर्चना निरगुळे, धनंजय देशमुख, हिदायत शेख, संजय कजेवाड, विश्वांभर सुरनर, विवेकानंद सुरनर आदींनी परिश्रम घेतले.