रूध्दा येथे पोलीओ लसीकरणाचे आयोजन

रूध्दा येथे पोलीओ लसीकरणाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील आरोग्य केंद्र अंधोरी यांच्या अंतर्गत असलेले आरोग्य उपकेंद्र रुद्धा यांच्या मदतीने आज दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्धा येथे पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उदघाटन रुद्धा नगरीचे उपसरपंच श्री बालाजी गंगाराम सुरणर व श्री बलभीम बापूराव देवक्तते यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिओ लसीकरण चालू असताना आंधोरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री जयप्रकाश केंद्रे साहेब यांनी भेट दिली. यावेळी डॉ.जयप्रकाश केंद्रे साहेब यांचा रुद्धा ग्रामपंचायत सदस्य श्री युवराज भगवानराव बदने यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी आरोग्य उपकेंद्र रुद्धा येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नाईक साहेब, आशा कार्यकर्ती श्रीमती शाहुताई केंद्रे, अंगणवाडी सेविका सौ.ज्योती बदने, आरोग्य कर्मचारी श्रीमती सुवर्णा केंद्रे, अंगणवाडी मदतनीस महादीकाबाई सुरणर उपस्थित होते

About The Author