महेश नागरी सहकारी पतसंस्था शाखेचा शुभारंभ
अहमदपूर (गोविंद काळे) : महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर ता. हडोळती येथील शाखेचा शुभारंभ आणि जनसुविधायोजना अंतर्गत २० लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून शाखेचा शुभारंभ आणि रस्त्याचे भूमिपूजन केले.
आपल्या मतदारसंघांमधील विकास कामांकरिता असलेली मागणी व माझा सततचा पाठपुरावा याचे फलित म्हणजे मोठ्या प्रमाणात विकास कामांकरिता लागणारा निधी आणून तो मतदार संघाचा विकास कामांमध्ये लागत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज जनसुविधायोजना अंतर्गत २० लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला असे मत यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मांडले
या कार्यक्रमप्रसंगी हडोळतीचे सरपंच सौ. शकुंतलाताई भोगे, मा. प्राचार्य व्यंकटराव मुळे, जि.प.गटनेते मंचकरावजी पाटील , युवा नेते सुरजभैय्या पाटील , सभापती शिवानंदतात्या हेंगणे, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जहागिरदार, रा.काँग्रेस ता.अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, शहराध्यक्ष अजझरभाई बागवान, महेश अर्बन बँक संचालक अशोक गादेवार, अभिनव पवार, इंदुताई पवार, टी. एन कांबळे, आर.एन वलसे सर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उत्तमराव माने, गंगाधर ताडमे, मोहन पाटील, बाबुराव सैदापुरे सर, भारत शिरसागर, चंद्रशेखर भालेराव, सादिक शेख, श्याम देवकते, रामप्रसाद जाजू, शिवानंद भुरे, प्रमोद पवार, मेहबूब पठाण, शार्दुल शेख, बालाजी पवार, अनिल पाटील, रामू मुळके, माधव गोजेवाड, अमृत भोगे, शेख साहेब, बालाजी मिरकले, अरबाज पठाण, रज्जाक शेख, माधव पवार, लताताई मदने, दत्ता हेंगणे, भीमाशंकर जाभाडे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.