बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीसाठी आमरण उपोषणाचा इशारा

बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीसाठी आमरण उपोषणाचा इशारा

अहमदपूर (गोविंद काळे) : क्रांती चौक येथील एका रहिवाशाच्या घराच्या शेजाऱ्याने बेकायदेशीर व अतिक्रमण करून खिडकी, लेंटर व भिंत बांधून तसेच संडासचा पाईप घरासमोर आणुन सोडल्याबद्दल सदरील अतिक्रमण त्वरीत हटवण्यासाठी नगरपालिका समोर दि २८ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याविषयी सविस्तर माहीती अशी, की शहरातील क्रांती चौक येथील रहिवाशी असलेले ब्रम्हानंद काशिनाथ गादगे यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना दि २१ फेब्रुवारी रोजी निवेदन दिले आहे कि माझा शेजारी मिर अकबर मुज्जफर अली व फवाद अली हे बेकायदेशिर बांधकाम अतिक्रमण व बेकायदेशिर खिडकी , लेंटर माझ्या बाजुने सोडत असल्याबाबत दि 14 जाने रोजी तक्रार दिली होती. तरी आपल्या कार्यालयाने दि 16 फेब्रुवारीला नोटिस दिल्यानंतर ही सदर शेजारी हे जोरजबरदस्तीने व आरमुठ , दांड पणाने माझ्या समाईक जागेत खिडकी, लेंटर सोडलेले आहे व भिंत पण बांधत आहे. तरी विनंती करतो की, त्याचे अतिक्रमण तात्काळ काढून टाकावे अन्यथा मी नगर कार्यालयासमोर दि 28 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करणार आहे याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी नगरपालिका यांना देण्यात आले आहे.

About The Author