श्यामलाल हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा !

श्यामलाल हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा !

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 27 फेब्रुवारी 2022रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मराठी भाषेचे महत्व यावर मार्गदर्शन केले. दिनांक 28फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त शाळेत विज्ञान प्रयोग प्रदर्शन, भारतीय तसेच जगभरातील विविध शास्त्रज्ञ व त्यांचे शोध यांचे भित्तीपत्रक, वैज्ञानिक माहिती, आकृती चार्ट इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उदगीर शहरातील प्रसिद्ध पत्रकार माजी मुख्याध्यापक श्री लक्ष्मण उगिले होते. विज्ञान दिनानिमित्त भारतातील थोर शास्त्रज्ञ डॉक्टर सी. व्ही. रमन व डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस श्री लक्ष्मण उगिले सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री चोबळे आनंद सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विज्ञान दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग प्रदर्शन, विविध शास्त्रज्ञ व त्यांचे शोध यांचे भित्तीपत्रक प्रदर्शन यामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे महत्त्व या विषयावर अनार्य नाईकवाडे, महाजन अश्विन, नावंदर राघवी,केंद्रे संजीवनी, तोडगिरे संचिता, राठोड पल्लवी,राजवीर बिरादार इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे आपले विचार व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व सर्वांनी आपल्या जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर विधायक कार्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये करावा याचा अतिरेक होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपा मध्ये लक्ष्मण उगिले सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचा उपयोग करून मानवा णे आपले जीवन कशा पद्धतीने विकसित केले आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, वैज्ञानिक दृष्टिकोन,विज्ञाननिष्ठा यावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी आपले जीवन विकसित करावे, अंधश्रद्धेचा निषेध करावा, विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट पडताळून पाहावी, विज्ञानाच्या मदतीने आपले जीवन सुखकर व प्रगतीशील करावे, मानव जीवनाच्या विकासासाठी, सुखासाठी विज्ञानाचा उपयोग व्हावा, विज्ञानाचा दुरुपयोग करून मानव व इतर जीवसृष्टीचा विध्वंस होणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घ्यावी व या सुंदर पृथ्वीचे संरक्षण करावे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरादार शुभांगी बसवराज या विद्यार्थिनीने केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभाग प्रमुख श्री लिमये राहुल , घोळवे अविनाश, शेख सईद, जाधव कालिंदी, जाधव धनश्री, उमाकांत सूर्यवंशी, राहूल नादरगे, बोळेगावे दिनेश इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

About The Author