चिंचोली (ब.) गावच्या विविध विकास कामासाठी एक कोटी रूपयाचा निधी उपलब्ध
लातूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्यांच्या आशिर्वादाने आणि गेल्या पंधरा वीस वर्षात ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला वेळोवेळी संघर्षात साथ दिली अशा कार्यकर्त्यांच्या कामाची त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीत हजारो मतदारांनी नोटाचे बटन दाबून नवा इतिहास घडविला याची दखल घेवून पक्षश्रेष्ठीने मला महाराष्ट्राचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. आमदारकीच्या कार्यकाळात चिंचोली बल्लाळनाथ गावच्या विविध विकास कामासाठी आमदार निधीसह विविध विभागामार्फत एक कोटी हून अधिक रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला एवढा निधी कधीच कोणीच दिला नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
लातूर तालुक्यातील मौजे चिंचोली बनाळनाथ येथील १ कोटी ५ लक्ष रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते रविवारी सायंकाळी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुनाथ कंटेकर हे होते यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, गोविंद नरहरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, जिल्हा परिषद सदस्य सुरज शिंदे, सुधाकर गवळी, रशिद पठाण, विनायक मगर, आनंत कणसे, भैरवनाथ पिसाळ, कार्यक्रमाचे संयोजक चिंचोलीचे उपसरपंच विश्वास कावळे काशिनाथ ढगे वैजनाथ लवटे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
चिंचोली बल्लाळनाथसह लातूर ग्रामीण मधील गावागावात आमदार निधी, जिल्हा परिषद, आणि शासनाच्या विविध विभागामार्फत विविध विकास कामासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मी जो कांही निधी दिला तो माझ्या घरचा नाही. तुमच्या हक्काचा आहे असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागातील कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक केली नाही. कुठल्याही विकास कामाला निधी उपलब्ध करून दिला नाही. निवडणूकीत दिलेली आश्वासने वा-यावर सोडली. आज जी कांही कामे सुरू आहेत ती केवळ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या विविध विभागामार्फत सुरू आहेत.
तरूणीच्या खुनाला जबाबदार असल्याने एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला तर कोटयावधीची वसुली करणाऱ्या चक्क ग्रहमंत्र्यालाच जेलमध्ये जावे लागले तर दहशतवादी कारवायांशी संबंधीत व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करून दहशतवाद्याला मदत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांनाही जेलची हवा खावी लागली. महाराष्ट्राच्या या भ्रष्ट आघाडी सरकारमधील येत्या काळात आणखी कांही मंत्री जेल मध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत असे सांगून आ. कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आजपर्यंत एकही कसलाही आरोप करता आला नाही. त्यांनी गोरगरीब सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे असताना कारखान्याच्या विश्वस्ताकडून शेतकऱ्यांची आडवणूक आणि पिळवणूक केली जात आहे. आज पंधरा सोहळा महिन्यापासून कार्यक्षेत्रातील ऊस उभा असताना गेटकेनचा उस गाळप करून गाळपावचा विक्रम करणारे साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच वाळवत आहेत. ऊसाचे वजन घटत आहे याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित करून आ. कराड म्हणाले की, मस्तवालपणा कराल तर शेतकरी कपडे काढल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही आ. कराड यांनी दिला. शेतकऱ्यांच्या हक्काचा कष्टाचा मोबदला मिळावा यासाठी आणि त्यांच्या आडवणूकीतून सोडवणूक करण्यासाठी प्रतिदिन २ हजार टन गाळप क्षमतेचा गुळपावडर आणि खांडसरी साखर निर्मिती बरोबरच सहा मेगावॅट वीज निर्मीती प्रकल्प उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या प्रकल्प उभारणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी यांनी नोंदणी करावी असेही आवाहन त्यांनी शेवटी केले.
भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड आमदार झाल्या पासून चिंचोली गावात आत्तापर्यंत सिमेंट रस्ता ७ लक्ष, विद्युतीकरण 3 लक्ष, खंडोबा मंदिर सभाग्रह ७ लक्ष, अंगणवाडी बांधकाम ७ लक्ष, नाथ मंदिर परिसर १० लक्ष, दलित वस्तीतील विविध कामासाठी ६० लक्ष रुपयाचा निधी आमदार फंड व जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत उपलब्ध करून विकास कामे होत आहे या सर्व कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आ. कराड यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात झाला. या कार्यक्रमास शहाजीआप्पा येलूरकर, धनराज शिंदे, समाधान कदम, आनंद पारवे, धनंजय जाधव, बालाजी नाईकवाडे, पांडुरंग गडदे, किशोर काटे, ईश्वर बुलबुले, अशोक कुलकर्णी, रमाकांत बंनाळे, रंगनाथ नवले, गोविंद नांदे, दत्ता चौधरी, सचिन कुलकर्णी, गोविंद पांचाळ, मज्जित आत्तार यांच्यासह चिंचोली येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय कावळे यांनी केले.