संत ज्ञानेश्वर विद्यालयात ऑनलाइन मराठी दिन साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ऑनलाइन मराठी दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात ऑनलाइन मराठी दिन दि २७ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्या रेखाताई तरडे होत्या तर मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, मुख्याध्यापक आशाताई रोडगे ज्येष्ठ शिक्षिका मीनाक्षी तोवर यांनी स्वरचित काव्यवाचन केले तसेच आबंदे संगीता यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला लातुर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज विनायक पाटील यांनी मराठी दिनानिमित्त मराठी भाषा, मराठी मायबोली, मराठी चा इतिहास यावर सखोल असे मार्गदर्शन केले यावेळी पुढे ते म्हणाले की आपल्या मुलांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे; आपण खूप भाग्यवान आहोत आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे तो वारसा आपण जतन केला पाहिजे. याप्रसंगी प्राचार्य रेखाताई हाके पाटील यांनी सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन अर्चना जांबळदरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आशाताई रोडगे मॅडम यांनी मानले सदरील कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने पालक व विध्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!