अजय मुरमुरेंचा फुले महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रा कडून सत्कार

अजय मुरमुरेंचा फुले महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रा कडून सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक अजय मुरमुरे यांनी नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोग , नवी दिल्लीच्या वतीने घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अजय मुरमुरे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या महात्मा फुले महाविद्याल अहमदपूरच्या अभ्यास केंद्रातून मराठी विषयामध्ये एम.ए.केले. तसेच यु.जी.सी. ने घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रता अर्थात नेट परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी अहमदपूरचे प्रतिष्ठित व्यापारी शिवाजीराव सुर्यवंशी यांची व अभ्यास केंद्राचे संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे, सहसंयोजक डॉ. संतोष पाटील प्रमुख उपस्थिती होती यासोबतच उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author