मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा सुलभक रामलिंग तत्तापुरे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : माय मराठी ही आपली मातृभाषा असून या भाषेला प्रथमतः आपल्या घरात व महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतून जपले पाहिजे . अग्रक्रमाने मातृभाषेतूनच बोलले गेले तरच या मराठी भाषेला जगात स्थान मिळेल म्हणून शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असे आग्रही प्रतिपादन मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक तथा सुलभक रामलिंग तत्तापुरे यांनी केले ते दि. 28 रोजी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे मराठी राजभाषा गौरव दिनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ शिवलिकाताई हाके पाटील प्रमुख अतिथी म्हणून संचालक कुलदीप भैय्या हाके पाटील प्राचार्या रूथ चक्रनारायण सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री रामलिंग दत्ता पुढे म्हणाले की सन 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे सीबी एस सी आय सी एस सी आणि इतर बोर्डा दही टप्प्याटप्प्याने मराठी हा विषय सक्तीचा केला असल्याचे सांगून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत मराठीचा टक्का वाढल्याचे सांगितले. यावेळी स्कूलच्या राजवीर हाके पाटील, यशश्री वारलावाढ, कृष्णा माने ,शर्वरी घाडगे, शेख तोसिफ, तेजस्विनी सुरणर या विद्यार्थ्यांचे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .प्राचार्या रूथ चक्रनारायण यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप शिवलिका ताई हाके पाटील यांच्या भाषणाने झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. सूत्रसंचालन सहशिक्षक भरत कानवटे यांनी तर आभार सहशिक्षक वैजनाथ धुळगुंडे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप कवी कुसुमाग्रज यांच्या कविताने करण्यात आला.