सम्राट चंद्रगुप्त मोरे इंटरनॅशनल स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

सम्राट चंद्रगुप्त मोरे इंटरनॅशनल स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून नमूद करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.असे मत संचालिका शिवलीका हाके यांनी मांडले. यावेळी मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तत्तापुरे सर,शेख जिलानी, अमोल पागे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रुत चक्रनारायण यांनी केले तर सूत्रसंचालन माल्कनी निजमोदिन, यांनी व आभार वैजनाथ धुळगुंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभांगी सूर्यवंशी, माल्कनी निजमुद्दिन, नवाल सय्यद, वैजनाथ धुळगुंडे केशव तोंडारे, रवी नरवटे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author