सावरगाव रोकडा येथे महाशिवरात्री निमित्त भावीकांची मोठी गर्दी

सावरगाव रोकडा येथे महाशिवरात्री निमित्त भावीकांची मोठी गर्दी

अहमदपूर (गोविंद काळे) : रोकडसावरगाव व पंचक्रोशीत प्रसिद्ध व जाज्वल्य असलेल्या संत बापुदेव महाराज व श्री काशी विश्वनाथ महादेव मंदीराचे दर्शन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी घेतले.महाशिवरात्री निमित्ताने रोकडा सावरगाव येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी यात्रा भरली होती. गेली दोन वर्षे कोवीड मुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने यावर्षीच्या यात्रेमध्ये भावीक भक्तांचा चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

विश्वस्त कमिटीच्या वतीने रमेश पाटील यांनी माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा सत्कार केला तसेच यावेळी त्यांच्या सोबत माजी उपसभापती राजकुमार खंदाडे ,निळकंठ पाटील, माजी सभापती सुधीर गोरटे, गोविंदराव गिरी यांचाही यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तानाजी रोकडे , सरपंच प्रवीण जाधव, रामभाऊ बेल्लाळे, अनिल जाधव, विश्वंभर बेल्लाळे, शिवकुमार पाटील, हनुमंत मुरुडकर , डॉ. जितेंद्र घोटे, अशोक घोटे, उत्तम शिंदे अरुण जाधव, भारत रोकडे , कल्याण काळे, धोंडीराम घोटे गजानन जाधव, बाळासाहेब बोडके, राजू बेल्लाळे, प्रशांत जाधव, नाथराव रोकडे ,गंगाधर घोटे, अवधूत गिरी, संजय काळे, सा.पोलीस निरीक्षक गि , विनायक वाघ, नंदू पुंडे, अमर वलांडे, रवी जाधव, कपिल मुरूडकर, लक्ष्मण सूर्यवंशी, गजानन जाधव, विष्णू आहेरकर, संदीप बेल्लाळे, बालाजी कोटलवार, अक्षय घोटे सुधीर बेल्लाळे, कृष्णा रोकडे, राहुल जाधव, निजाम शेख, धोंडीराम रोकडे, संभाजी रोकडे, यांच्या सह पंचक्रोशीत भावनीक भक्तसह रोकडासावरगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author