पोलीस प्रशासनात सेवाभावी वृत्तीने व सकारात्मक काम करावे – उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी

अहमदपूर (गोविंद काळे) : पोलीस प्रशासनामध्ये काम करताना आव्हानात्मक अनेक काम करावे लागतात. समाजातील अनेक अडचणी व समस्यांना तोंड द्यावे लागतात. दोन्ही बाजूंच्या लोकांना पोलीस प्रशासन न्याय देऊ शकत नाही म्हणून पोलीस प्रशासनात काम करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने सकारात्मक व पारदर्शी कामे करावीत असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण फुलारी यांनी केले. दि 28 रोजी प्रसाद गार्डन मंगल कार्यालयात पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव देवके यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने पोलिस प्रशासन व मित्र परिवाराच्या वतीने सपत्नीक सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, मंचावर माजी आमदार बब्रुवान खंदाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले यांचे दोन्ही सत्कार मूर्ती च्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. या समयी सेवानिवृत न्यायाधीश विजयकुमार बोडके, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक गोविंद शेळके, अश्विनी पिल्लेवार देवके यांचे मनोगत पर तर सत्कारमूर्ती नानासाहेब लाकाळ आणि बाबुराव देवकर यांचे सत्काराला उत्तर देणारे भाषणे झाली. प्रास्ताविक एपीआय रामचंद्र केदार यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापुरे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी मानले या सोहळ्याला अँटी करप्शन नांदेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर एच पाटील ,महेश बँकेचे संचालक डि के जाधव, पळसप चे सरपंच दीपक सरडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षी शिंगडे, प्रसादचे शरण चवंडा, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. हनुमंत देवकते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर बागवान , दोन्ही सत्कारमूर्ती चे नातेवाईक, मित्रपरिवार विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. सत्कार प्रसंगी दोन्ही सत्कारमूर्ती ना मानवंदना देण्यासाठी लातूर पोलीस बँड च्या वतीने स्वागत करून सत्कारानंतर दोन्हीही सत्कार मूर्तींना सजवलेल्या पोलीस व्हॅनमध्ये त्यांच्या निवासस्थाना पर्यंत नेण्यात आले.