पै.किरण शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात सध्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्याचा क्रेझ वाढत चालला असून भर रस्त्यावर उभे राहून केक कापणे, धिंगाणा घालणे असे प्रकार सर्रास चालू आहेत परंतु दुसरीकडे समाजात काही तरुण युवक आहेत ते समाजाचा विचार करत असतात. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो हा विचार आत्मसात करुन वाढदिवस हा सामाजिक उपक्रमानी साजरा करण्याचा प्रयत्न करतात. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून लातूर शहरातील पै. किरण शिंदे यांचा जन्मदिना निमित्ताने Bunty Fan Club च्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे लातूर शहर महानगर पालिका भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 16 च्या नगरसेविका शितल मालू यांच्या हस्ते रुग्णांना अन्न आणि फळ वाटपाचा कार्यक्रम दि.1मार्च वार मंगळवार रोजी यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी Bunty Fan Club चे सुमित (बंटी) गायकवाड, विजय शिंदे, प्रतिश कांबळे, किरण शिंदे, गौरव सदानंदे, यज्ञेश बागडे, अभिषेक शिंदे, इसाक हानुरे, अजय बनसोडे आदी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
