अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी जामीन फेटाळला

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी जामीन फेटाळला

पुणे (प्रकाश इगवे) : घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीस अश्लील शब्दांत बोलून तिला मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे ने यांनी फेटाळला. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सणसवाडी परिसरात ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हा प्रकार घडला.

आरोपी तरुण हा पीडित तरुणीचा आईच्या ओळखीचा आहे, घटनेच्या दिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती आणि तिची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती. आरोपी हा दारूच्या नशेत सायंकाळी सात वाजता घरी आला फिर्यादीशी अश्लील शब्दांत बोलून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने आरोपीच्या तावडीतून सुटून थेट पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार अर्ज दाखल केला.

About The Author

error: Content is protected !!