चिखली परिसरात दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

चिखली परिसरात दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी (रफिक शेख) : चिखली व देहूगाव येथे महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या दोन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चिखलीतील घटनेप्रकरणी शीतल हणमंत नेवाळे (रा. नेवाळे मळा, नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शीतल व त्यांच्या जाऊ तृप्ती या मंगळवारी (ता. १) सायंकाळी साडे सातच्या सुमारास महादेव मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी शीतल यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर चोरटे तेथून पसार झाले. तर दुसरी घटना देहगाव येथे घडली. या घटनेप्रकरणी पूजा सचिन झेंडे (वय रा. जकात नाक्यासमोर, झेंडेमळा, देहगाव) यांनी देहरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पूजा या मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास सासू व मुलासमवेत दुचाकीवरून संत तुकाराम महाराज मंदिराकडे चालल्या होत्या. देहूगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन चोरट्यांनी पूजा यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!