थेरगावमध्ये सव्वा लाखाचा गुटखा जप्त

थेरगावमध्ये सव्वा लाखाचा गुटखा जप्त

पुणे (रफिक शेख) : बेकायदा गुटख्याचा साठा व विक्री करणाऱ्या एकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्याच्याकडून सव्वा लाखाचा गुटखा जप्त केला. ही कारवाई थेरगाव येथे केली. हरीराम रत्नाराम विष्णोई (वय ३५, रा. सुखसागरनगर, कोंढवा, मूळ-राजस्थान), असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सागर याच्यावर गुन्हा दाखल आहे. एका मोटारीतून बेकायदा गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी (ता.१) थेरगाव येथील चर्चसमोर सापळा रचून हरीराम याला मोटारीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक लाख २५ हजार ८१० रुपयांचा गुटखा व तीन हजार ६९० रुपयांची रोकड सापडली. तर आरोपी सागर याने हा माल हरीराम याला पुरविल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!