Police Flash News

औराद शहाजानी येथे तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, २ लाख ५८ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

0
5
औराद शहाजानी येथे तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, २ लाख ५८ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या पैशांची बाजी लावून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या सात जणांविरुद्ध औराद शहाजानी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, तीन मोटारसायकली व पाच मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५८ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी १८.१० वाजण्याच्या सुमारास औराद शहाजानी येथील आरोपी अनंत विठ्ठल भंडारे यांच्या शेतातील आखाड्यावर काही व्यक्ती विनापरवाना पैशांची बाजी लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी कारवाई केली.

यावेळी अनंत विठ्ठल भंडारे, (वय ६२ वर्षे), लक्ष्मण वसंत कांबळे, (वय ५२ वर्षे), इरफान खुर्शिद मुल्ला, (वय ३८ वर्षे),युनूस बशीर पटेल, (वय ५२ वर्षे),

खाजा जाकीर चौधरी, (वय ३२ वर्षे),

राजेसाब दस्तगीर सय्यद,(वय ३५ वर्षे),हैदर महेमुद कुरेशी,(वय ३८ वर्षे)

सर्व रा. औराद शहाजानी, ता. निलंगा हे जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम २३ हजार ९२० रुपये, तीन मोटारसायकली अंदाजे किंमत १ लाख ७० हजार रुपये तसेच पाच मोबाईल फोन अंदाजे किंमत ६५ हजार रुपये, असा एकूण २ लाख ५८ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस अमलदार प्रशांत विजयकुमार हांडे यांच्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ), ४ व ५ अन्वये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत बांगर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार मनोज मोरे हे करीत आहेत.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts