Police Flash News

सकारात्मक दृष्टीकोण ठेवल्यास यश तुमच्या हातात आहे. — यशवंतराव बिरादार.

0
7
सकारात्मक दृष्टीकोण ठेवल्यास यश तुमच्या हातात आहे.   — यशवंतराव बिरादार.

उदगीर (प्रतिनिधी)

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात यश हवं असतं. त्यासाठी परिस्थितीनुरूप स्वतःला बदलून घेण्याची इच्छा देखील असते. परंतु प्रत्यक्ष तसं करणे किंवा त्यात सातत्य राखणे कठीण जाते. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करत राहिलो तर यश तुमच्या हातात असेल. असे मत यशवंतराव बिरादार यांनी व्यक्त केले. गेल्या सोळा वर्षापासून चालू असलेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत वाचक संवादाचे 372 वे पुष्पा माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक यशवंतराव बिरादार यांनी शिव खेरा लिखित यश तुमच्या हातात या साहित्यकृतीवर संवाद साधून गुंफले.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या विचार प्रणालीतील स्फूर्ती दायक तत्त्वज्ञान, व्यवहारी दृष्टिकोन आणि त्यावरील श्रद्धा याचे स्वयं मूल्यमापन करून व्यक्तिगत विकास आणि ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी लेखक शिव खेरा यांनी दृष्टिकोनाचे महत्त्व, यश, प्रेरणा, आत्म प्रतिष्ठा, संवाद कौशल्य, मन आणि सवयी, ध्येय, नीतीमूल्ये आणि दृष्टिकोन अशा एकूण आठ प्रकरणाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन या पुस्तकातून केलेले आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यानंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली.

अध्यक्षीय समारोपात बालाजी बिरादार म्हणाले की, यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न मिळणे असा नसून अंतिम ध्येय गाठण असा आहे. उच्च यश प्राप्तीची जिद्द बाळगणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी एम एस डिग्री प्राप्त करून डॉक्टर बनलेल्या डॉ. ऋतुजा अंबुलगे हिचा यथोचित असा सत्कार करण्यात आला .

सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या वाचक संवाद या कार्यक्रमास चंद्रकांत भुरे, दिगंबरराव देशपांडे, डॉ. संजीवनी भातांबरे, व्यंकटराव चिट्टे, रामविलास नावंदर, सिद्धेश्वर मोरे, श्रीराम काकडे, प्राचार्य डॉ.नामदेव खंडगावे, डॉ.नरेंद्र शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरभद्र स्वामी यांनी केले, तर संवादकांचा परिचय तुळशीदास बिरादार यांनी करून दिला. आभार गोविंद सावरगावे यांनी मांडले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts