Police Flash News

डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या आरोपीविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
5
डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या आरोपीविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील किल्लारी पोलीस ठाणे हद्दीत डायल 112 या आपत्कालीन पोलीस मदत यंत्रणेचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी नामे महेश आणाराव भडके, (वय 32 वर्षे, रा. पारधेवाडी, ता. औसा, जि. लातूर) याने दिनांक 30/10/2026 रोजी रात्री 22.40 वाजता डायल 112 MDT वर CFS ID-CFS 40594793 तसेच दिनांक 03/11/2026 रोजी रात्री 23.19 वाजता CFS ID-CFS 40693129 वर कॉल करून, आपणास खूप मारहाण झाली असून जखमी अवस्थेत असल्याने चालता येत नाही, व तात्काळ पोलीस मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावरून ड्युटीवरील पोलिस मदतीकरिता तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले असता सदरची माहिती ही खोडसळपणाने, व खोटी असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.

सदर माहितीच्या अनुषंगाने आरोपीने पोलीस यंत्रणेला खोटी माहिती देऊन दिशाभूल केली व शासकीय आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाल्याने किल्लारी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार दत्तात्रय जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 339/2026, कलम 212, 217 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार यादव हे करीत आहेत.

पोलीस प्रशासनाचे आवाहन.

डायल 112 ही नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदत उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण सेवा आहे. या सेवेचा खोटे कॉल करून अथवा चुकीची माहिती देऊन गैरवापर केल्यास आपत्कालीन मदतीच्या व्यवस्थेवर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी डायल 112 सेवेचा जबाबदारीने वापर करावा व खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेची दिशाभूल करू नये.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts