Police Flash News

भरत चामले यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश! लातूर जिल्हा बँकेची याचिका उच्च न्यायालयाकडून फेटाळली

0
221
भरत चामले यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश! लातूर जिल्हा बँकेची याचिका उच्च न्यायालयाकडून फेटाळली

लातूर (एल पी उगीले) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षात भरत तुकाराम चामले यांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची याचिका फेटाळून लावली आहे.

लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भरत चामले यांनी बीज प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, जिल्हा बँकेच्या खात्यावर संबंधित संस्थेचा व्यवहार नसल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज बाद केले होते.

या निर्णयाविरोधात भरत चामले यांनी कायदेशीर लढा सुरू ठेवला. या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत आता लातूर जिल्हा बँकेची याचिका फेटाळण्यात आली आहे.

या निकालामुळे भरत चामले यांच्या न्यायालयीन संघर्षाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील या प्रकरणाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतरही न डगमगता न्यायासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या भरत चामले यांच्या संघर्षात हा निकाल महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

उदगीर, देवनी आणि जळकोट, चाकूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून भरत चामले यांची ओळख आहे. स्व रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून एक आदर्श संस्था कशा पद्धतीने सहकार क्षेत्रात विकसित होऊ शकते, याचा आदर्श नमुना निर्माण करणारे भरत चामले सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला माहिती आहेत. नाफेडच्या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून खरेदी विक्री संघाच्या व्यवहारामध्ये त्यांनी पारदर्शकता आणलेली आहे. सहकार महर्षी भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाचा व्यवहार उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून कार्य करत असताना कुठल्याही तत्त्वाशी तडजोड न करता, शेतकरी सभासदांचे हित जोपासणारा एक स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा म्हणून त्यांच्याबद्दल आदरयुक्त सन्मान आहे. जिल्हा सहकारी बँक ही देशमुखच्या मर्जीतल्या सभासदांची बँक आहे, असे म्हटले जाते. असे असताना कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेल्या केवळ अजित पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या भरत चामले यांचा अर्ज रद्द करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या पुढार्‍यांनी का घेतला असावा? यावरूनच भरत चामले यांच्या नावाची दहशत जिल्हा बँकेच्या निवडणुकी मधल्या लोकांना आहे अशी मजेशीर चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुका मध्ये काय होईल? निकाल कोणाच्या बाजूने लागेल? हे अजून ठरायचे असताना, आजच त्याबद्दल भाकिते करून वेगवेगळे निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही. एक मात्र नक्की भरत चामले यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे निवडणुकीत चुरस वाढणार आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts