उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे शेकापूर येथील रामधन नाईक शिक्षण संस्था द्वारा संचलित शकुंतलादेवी बनसोडे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या संदर्भामध्ये शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद साधत पालक मेळावा घेण्यात आला. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर फराळाचे वाटपही करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीच्या दरम्यान अभ्यास करण्यासाठी नियोजन करून अभ्यास पुस्तिका व अभ्यासिकेचे वाटपही करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित श्रीधर राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून शेकापूरचे सरपंच विठ्ठलराव शेळगे, माजी सरपंच शरदराव देशमुख, भाजपचे नेते लक्ष्मण फुलारी (भालके), शेकापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नवाडे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे, ॲड. बालाजी शिंदे ,श्रीरंग कोनाळे, सुभाष बोरगावे, मुख्याध्यापक अभंग पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या वतीने चालवण्यात येत असलेले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे विविध उपक्रम यावरही याप्रसंगी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या प्रगती बद्दल पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
संस्थाचालक तथा शिक्षक वृंदाच्यावतीने शाळेच्या विकासाच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका मांडण्यात आली.
विद्यार्थी हा सर्वांगीण विकसित झाला पाहिजे. या दृष्टीने नवे नवे प्रयोग तथा तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. असे मुख्याध्यापक अभंग पवार यांनी याप्रसंगी सांगितले.














Responses (0 )