उदगीर (प्रतिनिधी? उदगीर येथील गुरुकुल स्पोर्ट्स क्लब अंतर्गत विविध शाळेतील 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थी,17 वर्ष वयोगटातील विद्यार्थी आणि 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थी यांनी धनुर्विद्या क्रीडा प्रकारात विभागीय पातळीवर सुवर्णपदक, रजत आणि कास्यपदक पटकावले आहे.
भक्ती संजय दळवे या 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी सोबतच आर्यन तीडोळे, यांनी सुवर्णपदक तर अनय भुसावळे या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल तसेच, मारिया पठाण, कृष्णा केंद्रे या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले आहे. 17 वर्षे वयोगटातील नैतिक बिराजदार यांनी सिल्वर मेडल पटकावले आहे. अथर्व जाधव यांनी याच गटात सिल्वर मेडल मिळवले आहे.
तर 19 वर्ष वयोगटांमध्ये गोकुळ बिरादार या विद्यार्थ्याने सिल्वर मेडल मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना मारुती बिराजदार या मार्गदर्शक शिक्षकाने उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या शाळेतील या सर्व विद्यार्थ्यांना मिळालेले यशाबद्दल उदगीर येथील क्रीडा प्रेमींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. आर्चरी अर्थात धनुर्विद्या या क्रीडा प्रकारामध्ये उदगीर शहराचे नाव उज्वल होत असल्याबद्दल उदगीरच्या क्रीडप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.














Responses (0 )