Police Flash News

गाड्या धुण्याचा नाही तर शस्त्र पूजनाचा सण विजयादशमी .. व्यंकट दशरथ

0
27
गाड्या धुण्याचा नाही तर शस्त्र पूजनाचा सण विजयादशमी  .. व्यंकट दशरथ

उदगीर (प्रतिनिधी)

आपण आपली परंपरा विसरत चाललो आहोत, विजया दशमी हा उत्सव शस्त्र पूजनाचा आहे . गाडी धुणे, सजविण्याचा नाही . आपल्या सर्व देवता या शस्त्र सज्ज आहेत . आपल्याला शक्य असेल त्या शस्त्राची पूजा करून विजयादशमी सण साजरा केला पाहिजे , यामुळे प्रत्येक शाखेवर त्या त्या भागातील नागरिकांना एकत्रित करून शस्त्र पूजन करावे. असे लातूर विभाग कार्यवाह व्यंकट दशरथ यांनी सांगितले .

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छत्रपती संभाजी महाराज नगर उदगीर मार्फत लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आयोजित शस्त्र पूजन कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर संघचालक लक्ष्मीकांत रायेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ हे होते .

पुढे बोलताना दशरथ यांनी सांगितले की, साधारण 30 वर्षापूर्वी पिठाची गिरणी बंद पाडण्याचे आंतर्राष्ट्रीय कारस्थान घडले होते . यासाठी अधिकारी आणि काही खासदारांना हाताला धरून नियम आणण्यात येत होता की, गहू , ज्वारी , डाळी साठी वेगवेगळी गिरणी असली पाहिजे , यामुळे प्रत्येकाला 4/5 वेगवेगळ्या गिरण्या ठेवणे शक्य नसल्याने पिठाच्या गिरणी बंद पडतील आणि या कंपन्याचे रेडीमेड पीठ विकले जाईल. या नियमा मागे असलेल्या अधिकारी , खासदार यांची माहिती घेतली गेली आणि हा नियम सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने रद्द करण्यात आला होता . आता पुन्हा आंतरराष्ट्रीय कारस्थानाची सुरुवात झाली आहे. फक्त आता ते वेगळ्या रूपात असे कारस्थान करीत आहेत, ते ओळखले गेले पाहिजे असे सांगितले .

ग्रामीण भागात मंडळ स्थापन करून गावातील एक टक्के तर शहरातील तीन टक्के स्वयंसेवक तयार करणे लक्ष असल्याचे सांगितले . उदगीर शहरात ४० वसती शाखा सुरू करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले .

चिन्मय बांसवाडकर यांनी वयक्तिक पद्य तर चेतन पाटील यांनी सामूहिक पद्य म्हटले. यावेळी कृष्णा बोयेनवाड, यशवंत बारस्कर , अमोल निडवदे ,रमाकांत चटनाळे , अमोल अंनकल्ले, दिनेश देशमुख , एकनाथ राऊत , प्रा.भंडे, सुरेश पाटील नेत्रगावकर यांच्यासह स्वयंसेवक हजर होते .

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts