उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील तुळजाभवानी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत खटके, उपाध्यक्ष आशिष कलुरे, सचिव विष्णू डोंगरे आणि बालाजी काळेकर तसेच इतर कार्यकारिणी सदस्य बंडू कांबळे, विशाल हळीकर, रवी खडके, विजय खडकोरे, रमेश खडके, ईश्वर खडके, अनिल खडके, शंकर खडके, विष्णू डोंगरे, लखन खडककोरे, चंदू खडके यांच्यासह नई आबादी मित्रमंडळाचे अनेक सदस्यांनी पुढाकार घेतला होता.
सध्या शहरातील रक्तपेढ्यामध्ये उपलब्ध असलेल्या रक्तपुरवठा विचारात घेऊन रक्तदानाचे महत्त्व तरुणांना सांगून रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त केले, तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना दुचाकीवरून जात असताना स्वतःचा जीव वाचावा, आणि घरच्यांना आधार कायम राहावा. या उद्देशाने हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. नवरात्र महोत्सव समितीच्या या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांनी अभिनंदन करून असेच उपक्रम इतर मंडळांनी राबवावेत आणि सामाजिक जाणीव जपाव्यात, असे आवाहन केले.














Responses (0 )