Police Flash News

डोंगरशेळकी येथील कृषी महाविद्यालयाचा गुजरात-राजस्थान शैक्षणिक दौरा उत्साहात संपन्न

0
72
डोंगरशेळकी येथील कृषी महाविद्यालयाचा गुजरात-राजस्थान शैक्षणिक दौरा उत्साहात संपन्न

डोंगरशेळकी येथील कृषी महाविद्यालयाचा गुजरात-राजस्थान शैक्षणिक दौरा उत्साहात संपन्न

उदगीर, (एल पी उगीले) तालुक्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीशी संलग्नित कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, ता. उदगीर येथील बी.एस्सी. च्या कृषि पदवीच्या पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय (पश्चिम भारत) शैक्षणिक अभ्यास दौरा, दिनांक २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर,२०२६ या कालावधीत संपन्न झाला.

या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यामध्ये गुजरात व राजस्थान राज्यांमधील राष्ट्रीय पातळीवरील नामांकित कृषि शिक्षण व संशोधन संस्थां बरोबरच ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन यशस्वीरित्या संपन्न झाला

या दौऱ्यात महाविद्यालयातील एकूण ७१ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, हा या शैक्षणिक दौऱ्यामागील प्रमुख उद्देश होता.

सदरील दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची तसेच स्मारकाची माहिती घेतली. त्याचबरोबर या शैक्षणिक दौऱ्यातील नियोजित कृषि अनुसंधान परिषेद संलग्नित राष्ट्रीय कृषी संस्थांना भेट देऊन कृषी क्षेत्रातील प्रगत संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, पीक उत्पादन, कृषि व कृषि आधारित विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

राजस्थान येथील भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी जंतर-मंतर या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली. प्राचीन काळातील वेळ मोजण्याची पद्धत, खगोलशास्त्रातील गणना, सूर्याच्या सावलीच्या आधारे वेळ व दिशा निश्चित करण्याच्या पद्धती याबाबत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाची ओळख झाली.

या शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून कृषी, विज्ञान, इतिहास व संस्कृतीचे ज्ञान मिळाले. दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणांना भेटी देऊन नवीन माहिती आत्मसात केली. त्यामुळे हा शैक्षणिक दौरा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व संस्मरणीय ठरला.

प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे असा विश्वास सहभागी झालेले महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व्यक्त केला.या शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन व नियोजन डॉ.दीपक पानपट्टे , प्रा. एम. व्ही. पाटील , प्रा. डायना मुशनमवार व गजानन मस्के यांनी केले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts