विकृतीला पाठिशी नाही; ‘आदर्श कॅम्पस’ प्रकरणात वकील मंडळाचा पीडितांना पाठिंबा
लातूर (प्रतिनिधी)
लातूर येथील ‘आदर्श कॅम्पस’ प्रकरणात संस्थाचालक बशीर शेख याच्याविरोधात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पीडित मुलींना न्याय मिळावा आणि प्रकरणाची निष्पक्षपणे कायदेशीर प्रक्रिया पुढे जावी, यासाठी विविध स्तरांवरून पाठपुरावा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार जाधव आणि त्यांच्या टीमची भेट डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी घेतली. आरोपीचे वकीलपत्र लातूरमधील कोणत्याही वकिलाने स्वीकारू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीवर वकील मंडळाने सकारात्मक भूमिका घेत पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या भूमिकेबद्दल वकील मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी वकील मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. लहुजी चामे, सहसचिव ॲड. सिद्धेश्वर धायगुडे, महिला सचिव ॲड. श्रद्धा कोरे पाटील, ॲड. वाय. डी. जगताप, ॲड. नितीन राठोड, ॲड. मंजुषा शिंदे, ॲड. सचिन कांबळे, ॲड. प्रदीप पाटील, ॲड. निलेश मुचाटे, ॲड. ललित तोष्णिवाल, ॲड. अभय खानापुरे, ॲड. शशांक जोशी, ॲड. अमित साळुंके, ॲड. अमित आर्वीकर, ॲड. नयना देवताळकर, ॲड. प्रकाश काळे, ॲड. मेघा पाठणकर, ॲड. मंदार मैंदरकर आणि ॲड. गणेश गोजमगुंडे यांच्यासह वकील बंधू-भगिनी उपस्थित होते.
पीडित मुलींना न्याय मिळेपर्यंत आणि प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.













Responses (0 )