Police Flash News

प्रकाश घादगिने यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान

0
7
प्रकाश घादगिने यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान

प्रकाश घादगिने यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान

लातूर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांची आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून पुरुष प्रवर्गात निवड झाली आहे.

या पुरस्काराचा वितरण सोहळा ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, माजी लोकसभा अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाश घादगिने यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रकाश घादगिने यांनी सामाजिक कार्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

यापूर्वीही त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तसेच विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रकाश घादगिने यांचे मित्रपरिवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts