Police Flash News

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणीमा जपत डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा

0
37
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणीमा जपत डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणीमा जपत डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा

उदगीर (एल पी उगीले) आपण या समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने सदैव सामाजिक सेवेमध्ये अग्रेसर असलेले डॉक्टर माधव चंबुले यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की वैद्यकीय सेवा सर्वसामान्य साठी कठीण झाली आहे असे असले तरीही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण माफक दरात शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केला आहे.

सध्या संपूर्ण परिसरात कोरड्या दुष्काळाचे भीषण संकट उभे राहिले आहे. पाण्याचे दुर्भिक्ष आणि शेतीचे झालेले नुकसान यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत, आजाराचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक गरजू रुग्ण उपचारांअभावी हाल अपेष्टा सहन करत आहेत. हीच गंभीर परिस्थिती ओळखून ख्यातनाम सर्जन माधव चंबूले यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी महिलांच्या विविध गंभीर आजारांवर तत्काळ कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियासह अस्थिरोग/हृदयरोग/जनरल/मुतखडा/कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया/ पोटातील आजार, लेप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉ. माधव वीरप्पा चंबुले यांनी माणुसकीच्या भावनेतून एक अत्यंत स्तुत्य आणि दिलासादायक उपक्रम सुरू केला आहे.

दुष्काळग्रस्त भागातील गरीब व गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि पैशांभावी कोणाचीही आरोग्य सेवा थांबू नये, यासाठी डॉ. माधव वीरप्पा चंबुले यांनी अल्प दरात विविध शस्त्रक्रिया आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

तातडीने आणि अत्यंत कमी खर्चात उपचार करण्याचा त्यांचा संकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे.

सध्याच्या आर्थिक टंचाईच्या काळात खाजगी रुग्णालयांमधील मोठ्या शस्त्रक्रियांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. हीच अडचण दूर करण्यासाठी डॉ. चंबुले यांनी त्यांच्या रुग्णालयात साई हॉस्पिटल प्रा.लि.कल्पना चित्रमंदिर जवळ, शेल्हाळ रोड उदगीर आणि उदयगिरी मल्टी स्पेशलिटी व अपघात हॉस्पिटल शेल्हाळ रोड उदगीर येथे विशेष सवलत योजना लागू केली आहे.

या उपक्रमांतर्गत गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया अत्यंत नाममात्र शुल्कात केल्या जाणार आहेत, जेणेकरून कोणत्याही कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहणार नाही.

चौकट......

तरच दुष्काळाशी लढा देणे शक्य: डॉ. माधव चंबुले

या उपक्रमाविषयी बोलताना डॉ. माधव चंबुले म्हणाले, "दुष्काळामुळे केवळ शेतीचेच नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. अशा वेळी कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास ती मोठी आपत्ती ठरते. एक डॉक्टर म्हणून समाजाप्रती आपले काही देणे लागते, याच भावनेतून आम्ही हा अल्प दरातील आरोग्य सेवेचा यज्ञ सुरू केला आहे. संकट काळात एकमेकांना साथ दिली, तरच आपण या दुष्काळाशी लढा देऊ शकू."

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:

• अल्प दरात शस्त्रक्रिया: विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अत्यंत कमी शुल्कात केल्या जातील.

• तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला: नाममात्र ओपीडी (OPD) शुल्कात रुग्णांची तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन.

• औषधोपचारात सवलत: गरजू रुग्णांना रक्त चाचणीत ५० टक्के रक्कमेत भरघोस सुट दिली आहे. व औषधांमध्येही जमेल तेवढी सूट देण्याचा प्रयत्न आहे.

• आपत्कालीन सेवा: दुष्काळग्रस्त भागातील गंभीर रुग्णांना प्राधान्याने उपचार.

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

आर्थिक मंदी आणि दुष्काळाच्या सावटात डॉ. माधव वीरप्पा चंबुले यांनी उचललेले हे पाऊल लाखो रुग्णांसाठी देवदूत ठरत आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून आणि वैद्यकीय क्षेत्रातातून भरभरून कौतुक होत आहे.

रुग्णांनी व गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी साई हॉस्पिटल प्रा.लि. हिमोडायलिसेस सेंटर युनिट, दंतरोग व मुखरोग विभाग, कल्पना चित्रमंदिर जवळ, शेल्हाळ रोड, उदगीर आणि उदयगिरी मल्टी स्पेशलिटी व अपघात हॉस्पिटल शेल्हाळ रोड, उदगीर, संपर्क क्रमांक ८२०८९३६२१९ / ९४२२४७२१९९ / 9422952109 / 91756 26370 / 91754 22809 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts