Police Flash News

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पदी राठोड रुजू होताच धडाकेबाज मोहीम सुरू

0
40
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पदी राठोड रुजू होताच धडाकेबाज मोहीम सुरू

लातूर (ॲड. एल पी उगीले) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गेल्या काही दिवसातील धडाकेबाज कामगिरीमुळे हा विभाग आता चर्चेत आला आहे. पूर्वी अत्यंत उपेक्षित आणि उदासीन कामगिरीमुळे या विभागाकडे सतत नकारात्मक दृष्टीने पाहिले जात होते. मनुष्यबळाची कमतरता, अनेक आडवळणाच्या ठिकाणी चालू असलेले धंदे, योग्य माहिती न मिळणे अशा एक ना अनेक कारणाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक धाडी म्हणाव्या तितक्या यशस्वी होत नव्हत्या. मात्र सध्या राठोड हे जिल्हाध्यक्ष म्हणून रुजू झाल्यापासून एका नंतर एक मोठ्या धाडी सुरू आहेत.

जिल्ह्यातील औसा तालुक्यातील येल्लोरी येथे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट मद्द निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. युवराज राठोड रुजू झाल्यापासून ही आठवी कारवाई आहे. यापूर्व अशाच धडाकेबाज धाडी यशस्वी करून दाखवले आहेत. औसा तालुक्यातील या कारवाईत ५ लाख २३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, लातूरचे जिल्हाधिकारी भारत बारस्कावड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त अमोल नाजणकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षता व अंमलबजावणी विभागाचे सह आयुक्त प्रसाद सुर्वे आणि नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड तसेच उपाधीक्षक एम. जी. मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये औसा तालुक्यातील येलोरी शिवारात आरोपी समाचार शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या बनावट मद्द निर्मिती कारखान्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रसायने जप्त करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अडीच हजार लिटर स्पिरिट बॉटलिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन, इसेन्स, फ्लेवरिंग एजंट, 180 मिली क्षमतेच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, बनावट मद्द निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण पाच लाख 23 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील गुन्ह्यामध्ये नागराज उत्तरेश्वर रिंगणकर आणि आदित्य जगन्नाथ बेडगे दोघे राहणार येलोरी तालुका औसा जिल्हा लातूर या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तर इतर आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या मार्गावर पोलीस पथक पाठवण्यात आले आहे.

सदरील साहित्याच्या आधारे बनावट आणि वेगवेगळ्या कंपन्यांची दारू बनवून बॉटलिंग मशीनच्या साह्याने सील करून ओरिजनल सारख्याच दिसणाऱ्या लेबलिंगने त्या बाटल्या बाजारात आणल्या जातात. विशेषतः धाब्यावरून किंवा ड्राय डे च्य दिवशी

तळीरामांना अशा पद्धतीच्या बनावट दारूच्या बाटल्या पुरवल्या जातात. फारसा फरक जाणवत नसल्याने तळीराम याचा आस्वाद घेत असतात. मात्र अशा बनावट दारूमुळे कित्येक वेळा दारू पिणारे मृत्युमुखी पडतात. परवाच पुण्यामध्ये 17 लोक विषारी दारूमुळे मृत्यू पावल्याची बातमी आली आहे. अशाच पद्धतीच्या बनावट दारूमध्ये थोडेसे प्रमाण कमी जास्त झाले की मग त्याचे दुष्परिणाम पाहायला वेळ लागत नाही. तशी परिस्थिती निर्माण करणारा हा बनावट कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नष्ट करून हा कारखाना चालवण्यासाठी जबाबदार असलेले आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरील कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूरचे अधीक्षक स्वतः युवराज राठोड तसेच उपाधीक्षक एम जी मुपडे हे उपस्थित राहून या पथकातील निरीक्षक आर एस कोतवाल, यु व्ही मिसाळ, दाते, दुय्यम निरीक्षक बी. आर. वाघमोडे, जी. व्ही. साळवे ,एस पी काळे, एसडी घुले, डी डी साळवी, आर एम माकोडे, एस राठोड, एस वाघमारे, बी आशमोड, व्ही एस पवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निलेश गुणाले, मंगेश खारकर, गजानन होळकर, एस केंगारे , जवान सौरभ पाटवदकर, ज्योतीराम पवार, श्रीकांत साळुंखे, संतोष केंद्रे, दिनेश गोमारे, गीता शेनेवाड, प्रथमेश फत्तेपुरे, विशाल सुडके, समाधान गिरी, बळीराम साखरे, ऋषिकेश चिंचोलीकर, भरत गायकवाड, शैलेश गड्डीमे, हनुमंत माने, मीरा हसुळे, शितल पवार, कपिल गोसावी यांनी सहभाग घेतला होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती डी साळवी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क निलंगा विभाग या करत आहेत.

अवैध मद्द विक्री व वाहतूक, साठवणूक विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून नागरिकांनी अवैध/बनावट मद्य बाबत माहिती असल्यास टोल फ्री क्र. 18002339999 अथवा व्हॉट्सॲप क्र. 8422001133 वर या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज गो. राठोड यांनी सांगून माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts