उदगीर (प्रतिनिधी) येथील श्यामलाल स्मारक प्राथमिक शाळेत वर्ग 1ली ते 4थी च्या विद्यार्थ्याची पालक शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली.
पालक, शिक्षक सहविचार सभेचे अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणि आर्य यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या सहसचिव अंजुमणी आर्य उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर श्यामलाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विवेक उगिले, श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण भोळे, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देशमुख संगीता पारिजात शिशुविहार च्या प्रमुख मोरतळे ताई , चामले ताई, पालक प्रतिनिधी भेदे ताई, पाटील ताई, द्वारका लामतुरे ताई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पालक, शिक्षक सहविचार सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पालकांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले. काही पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती बद्दल मनोगत व्यक्त करून समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापक विवेक उगिले यांनी बालवाडी ते 4थी पर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणि आर्य यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिकस्तर निश्चिती करून पुढील मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या विकासाच्या उपाय योजना यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. याचा निश्चितच श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यासंबंधी माहिती दिली.
पालक, शिक्षक सहविचार सभेचे मार्गदर्शक ॲड. सुपोषपाणि आर्य यांनी पालक मेळाव्यात उपस्थित सर्व पालक बंधू-भगिनी व विद्यार्थी यांना महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. संस्थेच्या दृष्टिकोनात असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून याचा निश्चितच फायदा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक, शारीरिक, मानसिक पातळी यांचा बारकाईने अभ्यास करून प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, कल, क्षमता विचारात घेऊन त्या विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक प्रगती जास्तीत जास्त कशी साधता येईल? यासंबंधी अविरतपणे शामलाल स्मारक शिक्षण संस्था कार्य करत आहे. या कार्यात विद्यार्थ्यांसह पालक बंधू, भगिनी, शिक्षक, मुख्याध्यापक यांची महत्त्वाची भूमिका आहे. यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच बालवयात विद्यार्थी जास्तीत जास्त मोकळ्या मैदानात खेळला पाहिजे, निसर्गाशी त्याचे नाते जडले पाहिजे, बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाजसेवा, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा यांचे बिजारोपण झाले पाहिजे. त्यासाठी पालक, शिक्षक यांनी हेतूपूर्वक या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासंबंधी अनमोल असे मार्गदर्शन केले.पालक शिक्षक सहविचार सभा अतिशय आनंददायी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. खूप मोठ्या संख्येने पालक वर्ग या सह विचार सभेस उपस्थित होता.
पालक, शिक्षक सहविचार सभेच्या कार्यक्रमाचे प्रभावीपणे सूत्रसंचालन अंतेश्वर बिरादार यांनी केले, स्वागत गीत रणमले सरशा तसेच विद्यार्थी संच वर्ग 2, 3 यांनी सादर केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले तर आभार श्रीमती चौधरी यांनी केले. पालक, शिक्षक सहविचार सभा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू, भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.














Responses (0 )