स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय लातूरच्या वतीने नळदुर्ग येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन

स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय लातूरच्या वतीने नळदुर्ग येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जेएसपीएम, लातूर व्दारा संचलित, स्वामी विवेकानंद वरिठ महाविद्यालयाच्या वतीने ऐतिहासीक किल्ला नळदुर्ग येथे कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ऐतिहासीक स्थळाची भेट घेउन तेथील स्थापत्यशास्त्र व वास्तुकला याचा जवळून परिचय व्हावा किल्ल्याची भव्यता व दिव्यता त्यांच्या लक्षात यावी, याच बरोबर त्या काळात अशा किल्ल्यांवर झालेल्या पराक्रमांचा परिचय करून द्यावा. निसर्गाशी संवाद साधावा या उदात्त हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

जे.एस. पी. एम. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लातूरचे माजी आमदार मा. शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब, उपाध्यक्ष मा. अजितसिंह पाटील कव्हेकर, सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखखील या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र प्राचार्य मनोज गायकवाड सर यांनी सहलीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख स प्राध्यापक सागर यादव, युवक कल्याण मंडळ व राज्यशास्त्र विभाग प्रमुख स प्राध्यापक जितेंद्र गायकवाड, स प्राध्यापक प्रांजली सरवदे, स प्राध्यापक सोनवणे सुलक्षणा, सप्राध्यापक डॉ. शिवशंकर कसबे, श्री. दिनेश शिंदे आदि उपस्थित होते. सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाचे प्रमुख स प्राध्यापक सुमित सातपुते यांनी सहलीचे संयोजक म्हणून भुमिका पार पाडली स प्राध्यापक दिक्षा धावारे स प्राध्यापक पुजा राठोड तसेच बी.ए., बी.कॉम व बी.एस्सी. च्या प्रथम व व्दितीय वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी उत्फुर्तपणे या सहलीमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी नळदुर्ग किल्ल्यात तीन किलोमिटर पसरलेली तटबंदी संरक्षण व्यवस्था रणमंडल, खंदक, पाणी महाल, टेहळणीचा उपल्या बुरुज, त्यावरील लांब तोफ, शिवाय ११४ बुरुज धबधबा दरवाजाचा चक्राकार मार्ग याची पाहणी करून शौर्य पराक्रम व भव्यता- दिव्यता याची अनुभूती घेतली. नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी यांच्याशी संबंधीत आहे. हा किल्ला कल्याणीच्या चालूक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राजाची शक्ले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशाहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोघल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली. या इतिहासाच्या पाउलखुणा विद्यार्थ्यांनी जाणुन घेतल्या. या सोबतच बी.एस्सी. च्या विद्यार्थ्यांनी येथे प्रात्यक्षीक कार्य करून सहलीचा आनंद घेतला.

About The Author