उपेक्षितांच्या कल्याणकारी मातृह्रदयी लोकमाता कमलबाई गवते

उपेक्षितांच्या कल्याणकारी मातृह्रदयी लोकमाता कमलबाई गवते

एका कुटुंबाची आई त्या कुटुंबाची सर्वेसर्वा जरी असली तरी ती आपल्या पंचक्रोशीतील हजारों लोकांची आई होत ती तिच्या विशाल अंत:करणाने आणि कार्याने असते. त्या मातेला आपण पूर्णार्थाने लोकमाताच म्हणत असतो. अशी लोकमाता म्हणजे हजारोत एक घडत असते. अनेक गावांच्या पंचक्रोशीतील लोकांची आणि सगळ्या गाणगोताची माय माऊली होत असते. अशी लोकउद्धारक, लोककल्याणकारी माय माऊली म्हणजे कै. सौ. कमलबाई गवते पाटील होय.
आईचे व्यक्तिमत्त्व आभाळाच्या अथांग पोकळीसारखे व्यापक, विस्तीर्ण आणि विशाल असते. ज्याप्रमाणे रात्रीच्या असंख्य चांदण्या मोजता येत नाही त्याचप्रमाणे आईच्या नात्याची आणि व्यक्तिमत्वांची ओळख शब्दात सांगता येत नाही. अखंड आयुष्यभर आई झिजत असते कष्टत असते, राबत असते, स्वतःला नात्यात आणि गणगोतात हरवून जाते… तीच खरी आई असते. अशाच आईला समाज,कुटुंब आणि जनमाणसात देवमातेचा दर्जा मिळत असतो. अशी सौभाग्यशाली देव माता काळाच्या दुखण्याने हरवल्यावर अवघी पंचक्रोशी पोरखी होत असते… हाच अतिव दुःखाचा अनुभव आज आपल्या सर्वांना येत आहे.
कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे.आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होईल.कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे, जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही.आनंदी कुटुंब म्हणजे स्वर्गाआधीचा स्वर्ग.
कुटुंबासोबतचा वेळ खूपच अमूल्य आहे परंतु अशा कुटुंबातून आपला एखादा माणूस निघून गेला की आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो असाच दुःखाचा डोंगर कोसळला तो गवते कुटुंबाच्या परिवारावर. आखेर काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि होत्याचे नव्हते होऊन गेले. गवते परिवार ममतेच्या सागराला पोरखा झाला. काळाने मायेची शाल हिरावून घेतली.एखादा धरणीकंप व्हावा, आकाशातील विजेने फटका मारावा,एखाद्या पुराने होत्याचे नव्हते होऊन जावे, एखाद्या सुंदर बागेला आग लागावी आणि वणवा पेटावा तीच अवस्था गवते परिवारावर आली.
कै.सौ. कमलबाई या शांत संयमी सुस्वभावी सोज्वळ मृदुभाषी चारित्र्यसंपन्न सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रात राहूनही कुटुंबवत्सल सर्व परिवाराची काळजी आणि जिम्मेदारी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळली राग द्वेष मत्सर गर्व अभिमान त्यांच्याजवळ फिरकला ही नाही आपल्या मुला प्रमाणे इतरांवरही तेवढेच ममत्व आणि जीव लावणाऱ्या .कै.सौ.कमलबाई ह्या सर्वांच्या गळ्यातील ताईत होत्या अडलेल्या नडलेल्या च्या त्या माता होत्या.जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोची भार साहे या वचनाप्रमाणे त्या नेहमी वागत असत.
कै.पद्मीनबाई व कै. विनायकराव आबाजीराव देशमुख राहणार कबनूर ता. मुखेड जि.नांदेड येथील तीनशे एकर चे जमीनदार असणाऱ्या श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झाला होता परंतु त्यांनी उभ्या हयातीत श्रीमंतीचा टेंबा कधीच मिरवत नव्हत्या पेनूर तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील पंचायत समितीचे सदस्य कै.बळीराम तुळशीराम गवते पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र सरपंच रामदास बळीराम गवते पाटील यांच्याशी 5 जून 1975 रोजी त्यांचा विवाह झाला त्यावेळी रामदास पाटील हे सरपंच पदावर बिनविरोध निवडून आले होते त्यांनी वीस वर्ष चेअरमनपदही भोगले पाच वर्षे कंधार पंचायत समितीचे सदस्य होते याही घराण्यात श्रीमंती कमालीची होती परंतु त्यांनाही कसलाही गर्व नव्हता पती गावचे सरपंच म्हणून त्या कधीही कोणाशीही वैरभाव ठेवत नव्हत्या उलट सर्वांना सोबत घेऊन आपल्या कुटुंबाप्रमाणे गावाची जबाबदारी सांभाळत होत्या.प्रत्येकाच्या सुखात दुःखात त्या खंबीरपणे पाठीमागे उभ्या राहात होत्या.रामदास बळीराम पाटील यांना आपल्या वडिलांकडूनच राजकीय वारसा मिळाला होता. कै.बळीराम तुळशीराम गवते पाटील हे त्या काळी दहा वर्षे उपसरपंच होते पाच वर्षे चेअरमनपदही त्यांनी भोगले पाच वर्षे पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. बळीराम पाटील म्हणजे त्या काळातील अनाथांचे नात होते.सोयरा पणातील मनाने मोठे असणारे श्रीमंत घराणे म्हणून त्यांची ओळख होती.
कै.सौ.कमलबाई रामदास गवते पाटील या पहिल्याच घराण्यातील सुनबाई म्हणून आल्या त्या कमालीच्या धार्मिक होत्या त्यांनी चार वर्ष 1 लाख वाती केल्या. पेनुर येथील महादेव मंदिरात त्यांनी एक लाख वाती वाहिल्या या कामे विठ्ठल नामदेव गवते,बळी मुकदम,तुकाराम ढेरे,चेबु सूर्यवंशी यांचेही सहकार्य लाभले होते.त्या रात्रभर महादेवाच्या समोर बसून त्यांनी एक लाख वाती प्रज्वलित केल्या होत्या.एवढी कमालीची धार्मिकता कुठेही पाहायला मिळत नाही त्यांच्या येण्याने गवती परिवाराच्या घराण्यात महालक्ष्मी च्या रूपाने भरभराट आली आणि प्रगतीचे अनेक टप्पे त्यांनी गाठले त्यांना चार अपत्ये झाली सौ.मीनाताई बालासाहेब पाटील चिकलचांदा ता.भालकी जिल्हा बिदर.सौ.ज्योती भास्कर नळगे नगरसेविका कंधार.चिरंजीव महादेव रामदास पाटील गवते,व उत्कर्ष रामदास पाटील गवते.या चार अपत्यांना त्यांचा संसार फुलत गेला होता आकाशातील टिपूर चांदण्या सारखं त्यांच आयुष्य प्रकाश मय झालं होतं पती-पत्नीच्या आयुष्यातील सुखांच्या सरी येत होत्या इंद्रधनुष्याच्या रंगासारखे आयुष्य रंगमय झाले होते.कुटुंबातील प्रेम ओसंडून वाहत होते परंतु कळाला हे मात्र सहन झाले नाही प्रचंड दुःखाच्या सागरात लोटून गवते परिवार माया ममतेला पोरका झाला. रामदास पाटील गवते यांच्या आयुष्याचा आधारवड संपला त्यांनी टाहो फोडून डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी करून दिली आज हा लेख लिहीत असताना त्यांना त्यांच्या पत्नी बद्दल विचारले असताना ते निशब्द झाले त्यांच्याबद्दलच्या आठवणी काही सांगा असे विचारले असताना ते म्हणाले आकाश एवढ्या उंच आणि साजरा सारख्या अथांग आठवणी काळजाच्या कुपित कोरून ठेवल्यात.काय सांगु आता.
हजारो घराण्यातील तंटे सोडविणारा हजारो माणसांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणारा संकटाच्या ठिकाणी उभा राहून संकटावर मात कशी करावी हा शिकवणारा माणूस सुद्धा पत्नीच्या प्रेमापोटी किती पोरका होतो किती हळवा होतो आणि किती टाहो फोडतो हेच अण्णाच्या मुखातून आलेला हुंदका अश्रूंना वाट मोकळी करून देतो त्यांचे बोलताना शब्द निशब्द झाले.
आमची बहिण विमलबाई विठ्ठलराव ढवळे पाटील यांच्यासोबत एकदा कै सौ कमलबाई च्या घरी गेलो माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरवत म्हणाल्या बापू मारोती खूप शिक आणि मोठा हो तू आई वडिलांचे नाव करशील बघ त्यांनी दिलेला आशीर्वाद हा माझ्यासाठी दिपस्थंब ठरला आहे.ही घडलेही घटना माझ्या आयुष्यात त्यांच्या आशीर्वादाने माझ खुप भल झालयं एखाद्या चारित्र्यसंपन्न माऊलीच्या हाताचा परीसस्पर्श माथ्यावरुन फिरवताना काय जादू होऊ शकते हे मी सुद्धा अनुभवले होते माझी तीच आठवण माझ्या मनात अजूनही घर करून आहे.
आज त्यांच्या घरात दोन नवीन सुनांचे आगमन झालेले आहे त्यांच्या घराण्यात प्रीती आणि नेहा या दोन सुनाचे आगमन सुद्धा सासूबाई च्या पायावर पाऊल ठेवून नक्कीच आहेत त्यात शंका नाही.
ज्यावेळी कै.सौ.कमलबाई चे घरात आगमन झाले त्यावेळी परिवार खूप मोठा होता त्या पहिल्याच घरात सून आल्याने त्यांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या त्या काळात संभाजी तुळशीराम गवते पाटील आणि बळीराम तुळशीराम गवते पाटील या दोन भावाचा दरारा सोयऱ्या धायर्यात पाहुणे मंडळीत खूप मोठा होता पाहुण्यात सगळ्यात श्रीमंत असणारी ही मंडळी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते परंतु या घराण्याने कधीच बडेजावपणा केला नाही.लक्ष्मण गवते पाटील व प्राचार्य डॉ अशोक गवते पाटील हे लहान असताना त्यांना पोटच्या पोराप्रमाणे सांभाळण्याचे त्यांनी काम केले.
सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण काम करताना राग द्वेष मत्सर गर्व
सौ.कै.कमलतबाईने केला नाही.कमलबाई हे केवळ एक नाव नसून धगधगता जीवन प्रवास होता इतरांच्या डोळ्यातील अश्रु पुसताना त्या नेहमीच अनाथांच्या,उपेक्षितांच्या तसेच वंचितांना जगण्याची नवी उमेद देणाऱ्या अखंड ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत होत्या.आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये कमलबाई रामदास गवते पाटील यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ही संकल्पना त्यांनी आयुष्यामध्ये राबविली गोरगरिबांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने, मृदुभाषी शब्दाने शब्दाने आपलसं करणा-या त्या सर्वांच्या माऊली होत्या.
“ज्यांना कोणीच नाही त्या सर्वांसाठी मी आहे” असे त्या अत्यंत प्रेमाने बोलून दाखवित.आपण एक सामान्य स्त्री ते असामान्य आई असा त्यांचा जीवनप्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा उर्जास्तोत होता.
नव्वदच्या दशकापर्यंत कंधार आणि लोहा तालुका हा शे.का.प.चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.मन्याड खोऱ्यातील वाघ म्हणून भाई केशवराव धोंडगे साहेबांची ओळख महाराष्ट्राला होती एखाद्या जंगलात वाघाने जशी डरकाळी फोडावी तसी लोकसभेत आणि विधानसभेत ते जनसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर घेऊन सोडवत सर्वसामान्यांचा लोक नेता कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण भाई केशवराव धोंडगे साहेबाकडे जाते. ग्राम पंचायत ते विधान सभा अशा सर्व प्रातिनिधिक संस्थांमध्ये शे.का.प.चे अनेक उमेदवार बहुमताने निवडले जात असत.त्या काळात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मा.आमदार मा.खासदार भाई केशवरावजी धोंडगे आणि मा.आ.भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत भाई बळीराम पाटील गवते आणि श्री रामदास पाटील गवते यांचा पक्षाच्या वाढीमध्ये सिंहांचा वाटा होता.सामान्य , गोरगरीब कार्यकर्त्यांच्या सुखदुःखापासून ते अगदी मिठमिरच्यापर्यंतचे प्रश्न अत्यंत तळमळीने आणि पोटतिडकीने सोडवून कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता दिवंगत भाई बळीराम पाटील गवते आणि श्री रामदास पाटील गवते यांनी समाजकारणात आणि राजकारणात आपली एक वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे.भाई केशवराव धोंडगे आणि कै बळीराम पाटील गवते यांच्यात ऋणानुबंधाच्या रेशीम गाठी मुला-मुलीच्या बांधल्याने त्यांच्यात अधिक जवळीकता आली.भाई हे बोलके सुधारक नाहीत तर ते करते सुधारक आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे. नुसत्या जातिधर्माच्या सुधारणेच्या गप्पा मारून चालत नाही ते प्रत्यक्षात उतराव्या लागतात हेच भाई केशवराव धोंडगे साहेबांनी समाजाला दाखवून दिले त्यांच्या सारखे नेतृत्व आज मला तर बघायला मिळत नाही.आधी केले आणि मग सांगितले या तत्त्वाचे पालन करणारे खरेखुरे भाई कर्ते समाजसुधारक आहेत. बळीराम पाटील गवते महाविद्यालयाची पेनुर ची स्थापना जून 2000 मध्ये त्यांनी करून दिली. स्वतःच्या पक्षाला दिलेल्या बळकटीतून व लेकीच्या श्रृणातून ते उत्तराई झाले. गवते कुटुंबीयांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला पुढे नेण्यासाठी गॄहिणी म्हणून भक्कम साथ आणि आधार कै.सौ.कमलबाई रामदास पाटील गवते यांनी दिलेली होती.पेनूर गावातील गोरगरिबांच्या मुलींच्या लग्न कार्यापासून ते गावातील कोणत्याही धार्मिक , सामाजिक कार्यात अत्यंत मोलाचे योगदान कै.सौ.कमलबाई गवते पाटील यांचे राहिलेले आहे.
कै.सौ.कमलबाई रामदास पाटील गवते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पेनूर ता.लोहा जि.नांदेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन… लोहा तालुक्यातील शे.का.प.चे ज्येष्ठ नेते दिवंगत भाई बळीराम पाटील गवते यांच्या सूनबाई आणि कंधार पंचायत समितीचे मा.सदस्य पेनूर पंचक्रोशीत सामान्य माणसाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होऊन जनसामान्यांशी आपली नाळ कायम ठेवणारे पेनूर ग्रा.पं.चे मा.सरपंच श्री रामदास बळीराम गवते पाटील यांच्या धर्मपत्नी कै.सौ.कमलबाई रामदास पाटील गवते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे अॕड.उत्कर्ष पाटील गवते यांनी कळविले आहे..त्यांच्या कार्याप्रती आणि स्मृतीप्रती पुण्यभाव आणि श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी युवानेते अॅड उत्कर्ष रामदास पाटील गवते , महादेव रामदास पाटील गवते, तसेच त्यांच्या मुली सौ.मीनाक्षी बालाजी पाटील, कंधार न.प.च्या नगरसेविका सौ.ज्योती भास्करराव नळगे ,पुतणी अनुजा अशोक पा.गवते,पुतणे हर्षद लक्ष्मण पा.गवते, अनिकेत लक्ष्मण पा.गवते, नितीन आबासाहेब पा.गवते, वैभव सुभाष पा.गवते, निखिल शिवाजी पा.गवते या सर्वांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने कै.सौ.कमलबाई रामदास पाटील गवते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.त्यामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.जय महाराज सरनाईक यांचे कीर्तनही होणार आहे.पेनूर व पेनूर परिसरातील सर्व जनतेने या कार्यक्रमास उपस्थिती लावावी अशी विनंती श्री रामदास पाटील गवते, श्री लक्ष्मण पाटील गवते, प्राचार्य डॉ.अशोक पाटील गवते यांनी केली आहे.
प्राजक्तांच्या दिव्य फुलांनी देह झिजविला ज्यांने आनंत त्यांची जीवन यात्रा कधी न सरे मरणाने

शब्दप्रपंच:
✍🏻 प्रा.मारोती बुद्रुक पाटील

About The Author